ऋतिक रोशन याचा सुपर 30 चित्रपट पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी म्हटले असे काही....
अमृता फडणवीस आणि ऋतिक रोशन (Photo Credits: Instagram)

ऋतिक रोशन (Hrithik Roshan) याचा नुकताच प्रदर्शित झालेला 'सुपर 30' (Super 30)  चित्रपट बॉक्सऑफिसवर चांगलीच कमाई करत असून प्रेक्षकांच्या खुप पसंदीस पडत आहे. मात्र आता सुपर 30 चित्रपट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांना फारच आवडला आहे. तर आज ऋतिक याने ट्वीटवरुन विवेक ओबेरॉय आणि अमृता फडणवीस यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.

ट्वीट करत ऋतिक याने असे म्हटले आहे की, खुप प्रतिभावान अशा अमृता फडणवीस आणि विवेक ओबेरॉय यांना भेटून आवडले. तुम्ही जे महत्वपूर्ण काम करत आहात त्यासाठी शुभेच्छा.

तर ऋतिकच्या या ट्वीटवर अमृता यांनी उत्तर देत असे म्हटले आहे की, ऋतिकचे तुझे खुप आभार आणि सुपर 30 सारख्या चित्रपटासारखे आम्हाला अजुन चित्रपट पाहायला आवडतील.

(Super 30: बॉक्स ऑफिसवर हृतिक रोशन च्या 'सुपर 30'ची धूम, दोन दिवसात बक्कळ कमाई)

सुपर 30 हा चित्रपट बिहार मधील गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार यांनी गरिबी आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना शिक्षण देत आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी तयार केले. त्यांच्या आयुष्यावरील हा चित्रपट त्यांनी ही गोष्ट सत्यात करुन दाखवण्यासाठी किती संघर्ष केला आहे याचे दर्शन घडवते.