Madhuri Dixit Nene (PC - Instagram)

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने (Madhuri Dixit Nene) हिने आपला हरियाणातील पंचकूला येथील बंगला विकला आहे. माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम माधव नेने यांनी प्रॉपर्टी विक्रीबाबतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला बंगला माधुरीने विकल्यामुळे सगळीकडे जोरदार चर्चा रंगली आहे. 'क्लीयर ट्रिप डॉट कॉम'चे (ClearTriip.Com) संस्थापक सदस्य अमित तनेजा यांनी हा बंगला खरेदी केला आहे.

हा बंगला हरियाणाच्या पंचकूला एमडीसी सेक्टर 4 मध्ये होता. माधुरीने हा बंगला 3.25 कोटी रुपयांना विकला आहे. माधुरीला हा बंगला 1996 मध्ये हरियाणातील माजी मुख्यमंत्री चौधरी भजनलाल यांनी मुख्यमंत्री कोट्यातून दिला होता. दरम्यान, हा बंगला विक्री करण्याची संपूर्ण प्रक्रिया माधुरीचे पती नेने यांनी पूर्ण केली आहे. (हेही वाचा - Happy Birthday Apurva Nemlekar: जाणून घ्या तुमच्या लाडक्या रात्रिस खेळ चाले 2 मधील शेवंता म्हणजेच अपूर्वाच्या काही खास गोष्टी)

 

View this post on Instagram

 

Wanderlust ✨

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

 

View this post on Instagram

 

Cannot wait to use this beauty iPhone 11 Pro Max & this amazing @apple watch series 5! #iPhone11ProMax

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene) on

माधुरीला ज्यावेळी हा बंगला अलॉट करण्यात आला होता, त्यावेळी माधुरीने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. 90 च्या दशकात माधुरीने एकामागे-एक दमदार चित्रपट केले. याच काळात माधुरीची 'हम आपके है कौन', 'अंजाम' आणि 'राजा' या सारख्या चित्रपटातील भूमिका विशेष गाजल्या. पंचकूला येथील हा 310 क्रमांकाचा बंगला माधुरीच्या नावाने ओळखला जात होता. हा बंगला पाहण्यासाठी पाहण्यासाठी अनेक नागरिक उपस्थिती लावत असतं. परंतु, आता माधुरीने हा बंगला विकला आहे.