Panchak Movie: माधुरी दीक्षितचा 'पंचक' चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला, हे कलाकार मुख्य भुमिकेत
Madhuri Dixit

Panchak Movie:  माधुरी दीक्षीत आता एका नव्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. पंचक चित्रपटासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. बॉलिवूडच्या चित्रपटात माधुरीने धमाकेदार अभिनय करून प्रेक्षकांची मने जिकंली. मनोरंजनसृष्टीत माधुरीने आपलं एक वेगळीच ओळख बनवली आहे. आगामी चित्रपट पंचक या सिनेमात माधुरी दीक्षित झळकणार आहे. माधुरी दीक्षितसोबत अभिनेता आदिनाथ कोठारे आणि तेजश्री प्रधान हे मुख्य भुमिकेत असणार आहे.  5 जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

आनंद इंगळे, नंदिता पाटकर, विद्याधर जोशी, भारती आचरेकर, सतीश आळेकर, सागर तळाशीकर, दिलीप प्रभावळकर, दीप्ती देवी, संपदा जोगळेकर, आशिष कुलकर्णी हे कलाकार या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या दमदार कलाकारांनी भरलेला चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची आतुरता लागली आहे. जयंत जठार आणि राहुल आवटे हे या चित्रफटाचे दिग्दर्शन सांभाळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dr Shriram Nene (@drneneofficial)

माधुरी आणि त्याच्या पती डॉ श्रीराम नेने यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. सोशल मीडियावर माधुरीचा चाहता वर्ग मोठा आहे. प्रेक्षकांना या सिनेमाची आतुरता लागली आहे.  द फेम गेम या वेब सीरिज मुळे माधुरीने ओटीटीवर पदार्पण केलं.