'रंगतारी'चा नवा विक्रम ; ठरले जगातील सर्वाधिक पाहिले गेलेले गाणे
आयुष शर्मा (Photo Credits: Instagram)

आयुष शर्माचा लव्हरात्री सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे 'रंगतारी' हे गाणे प्रदर्शित झाले. यो यो हनी सिंगचे हे गाणे सुपरडुपर हिट ठरत आहे. कारण अलिकडेच या गाण्याने नवा विक्रम केला आहे.

२४ तासांत जगातील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या गाण्यांच्या यादीत या गाण्याचा समावेश झाला आहे. या यादीत या गाण्याने पहिले स्थान पटकावले आहे. गायक आणि रॅपर हनी सिंगने सोशल मीडिया अकाऊंटवर ही माहिती शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

No.1 in the world . #Rangtaari #loveratri @beingsalmankhan @skfilmsofficial @tanishkbagchi @aaysharma @itsrdm

A post shared by Yo Yo Honey Singh (@yyhsofficial) on

लव्हरात्रीबरोबरच मित्रों सिनेमातील दिस पार्टी इज ओव्हर हे गाणे देखील यो यो हनी सिंगने गायले असून ही दोन्ही गाणी अत्यंत लोकप्रिय होत आहेत. गेल्या वर्षी यो यो हनी सिंगच्या 'चार बोटल वोडका', 'ब्लू आईज' आणि 'लव डोस' यांसारख्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती.

लव्हरात्री या सिनेमातून आयुष शर्मा बॉलिवूडमध्ये पर्दापण करत आहे. त्याच्या करिअरमधील पहिल्या गाण्याने नवा विक्रम केला आहे.