Lok Sabha Elections 2019: शर्लिन चोपडा सेक्सी अंदाज, लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे मतदारांना अवाहन (व्हिडिओ)
Sherlyn Chopra | (Photo Credit: Facebook and YouTube)

Lok Sabha Elections 2019: आपल्या सेक्सी आणि तितक्याच घायाळ करणाऱ्या अंदाजात सोशल मीडियावर व्हिडिओ, फोटो आदींच्या माध्यमातून वावरणे शर्लिन चोपडा (Sherlyn Chopra) हिच्यासाठी नवे नाही. सोशल मीडिया (Social media) हा शर्लिनच्या जनमानसातील ओळखीचा एक भाग आहे. नुकतात तिचा असाच घायाळ करणारा पण, चांगला संदेश देणारा बोल्ड व्हिडिओ (Bold video) सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओत शर्लिन लोकशाहीसाठी महत्त्वाचा असलेला संदेश देताना दिसते. पाच वर्षे पूर्ण झाली आता आपल्या विवेक बुद्धीला स्मरुण मतदान करा. काहीही करा पण मतदान करा (Vote Daal) असे शर्लिन व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. हा व्हिडिओ म्हणजे एक रॅप (Rap) आहे.

मतदारांना मतदानाचे अवाहन करत लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्याचा संदेश देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडिओतील गाण्यात शर्लिनचा बोल्ड अंदाज काहीसा अधिकच लक्ष वेधून घेताना दिसतो. आपल्या खास सेक्सी अंदाजात ती मतदारांना मतदान करण्याचे अवाहन करते आहे. या गाण्याचे बोलही 'वोट डाल' असेच आहेत.

शर्लिन चोप्रा रॅप व्हिडिओ 'Vote Daa'

शर्लिन चोप्रा हिने आपल्या युट्युब चॅनलवर हा व्हिडिओ 24 एप्रिल रोजी अपलोड केला आहे. आतापर्यंत हा व्हिडिओ 8,026 लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओतील गाण्याचे रॅप Sherlyn Chopra, संगीत - Teenu Arora, गाण्याचे बोल आणि व्हिडि - Sherlyn Chopra यांचा आहे.