Lesbian Crime, Action आणि सगळंच 'डेंजरस'; राम गोपाल वर्मा दिग्दर्शित चित्रपट 'Dangerous' Traile पाहिलात का?
Dangerous Movie Trailer (Edited Image)

बॉलीवुड चित्रपटांमध्ये प्रदीर्घ काळापासू विविध विषय हाताळले गेले आहेत. परंतू, या सर्व विषयांना छेद देणारा एक नवा विषय घेऊन दिग्दर्शक राम गोपाल वर्मा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'डेंजरस' (Dangerous) असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर (Dangerous Movie Trailer) प्रदर्शित झाला. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांबाब राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) ओळखले जातात. या वेळीही डेंजरस चित्रपटातून ते समलैंगिक क्राईम अॅक्शन (Lesbian Crime, Action) पाहायला मिळणार आहे. भारतातील पहिली समलैंगिक (Lesbian) क्राईम अॅक्शन फिल्म अशी या चित्रपटाची ओळख करुन दिली जात आहे. ट्रेलर पाहून तर ही ओळक प्रेक्षकांच्या कसोटीवर खरी ठरेल असे दिसते.

राम गोपाल वर्मा यांच्या 'डेंजरस' चित्रपटाचा ट्रेलर 13 मे 2021 या दिवशी डिजिटल प्लॅटफॉर्म  आणि नव्या स्पार्क ओटीए प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला. चित्रपटात नैना गांगुली आणि अप्सरा राणी प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट स्पार्क कंपनी द्वारा निर्मिती करण्यात आला आहे.

ट्रेलर पाहून वाटते की, डेंजरस ही दोन महिलांची कथा आहे. ज्यात त्यांचे काही पुरुषांसोबतचे अनुभव वाईट असतात आणि त्यामुळेच त्या दोघी एकमेकांच्या प्रेमात पडतात. चित्रपटाची कथा जसजशी पुढे जाते तसतसे या दोघी आपल्या प्रेमाचे रक्षण करण्यासाठी थेट पुरुषांसोबत संघर्ष करताना आढळतात. यातून हाणामारी, खून खराबा, हत्या पर्यंत गोष्टी टोकाला जातात. अर्थात या सर्वात बोल्ड सिन्स, विषेष प्रकारची उत्तेजक दृश्य यांची रेलचेल आहेत. शिवाय दोन महिला एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुरुषांशिवाय त्या आपल्या लैंगिक गरजा भागवतात ही दृष्य अनेकांसाठी धक्कादाय असू शकतात. हे नक्की.

चित्रपटाबाबत बोलताना राम गोपाल वर्मा यांनी म्हटले आहे की, 'सन्मानीय सर्वोच्च न्यायालयाद्वारे कलम 377 हटवल्यानंतर एलजीबीटी समुहावर भाष्य करणारी ही पहिलीच फिल्म आहे. माझा उद्देश हा दोन महिलांची प्रेमकहाणी आणि एक पुरुष आणि महाला यांच्यातील मर्यादा दाखवणे हा आहे''. राम गोपाल वर्मा यांनी पुढे असेही म्हटले आहे की, या चित्रपट या प्रेमिकांना पोलीस आणि गुंडांपासून धावाता पाहायला मिळेल. या चित्रपटाचे सर्व चित्रिकरण हे गोव्यात करण्यात येईल. ट्रेल आज एका अजब कहाणीसोबत प्रदर्शित होतो आहे आम्ही आरजीव्ही स्क्रीन वर नव्या स्फोटासाठी प्रतिक्षा करत आहोत.