Munjya OTT Release: अखेर हॉरर कॉमेडी चित्रपट मुंज्या आता घर बसल्या बघता येणार आहे. ओटीटावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची निर्मात्याने घोषणा केली आहे. हा चित्रपट २५ ऑगस्ट २०२४ रोजी जाहिर केला आहे. प्रेक्षकांना पसंद पडलेला हा चित्रपट पुन्हा एकदा ओटीटीवर पाहता येणार आहे. हा चित्रपट जून महिन्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला. प्रेक्षकांनी या चित्रपटाला भरपूर पसंदी दिली होती. (हेही वाचा- श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव स्टारर 'स्त्री 2' चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, 360 कोटींहून अधिकची कमाई)
कुठे पाहता येणार मुंज्या चित्रपट
आदित्य सरपोतदार यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनला, चित्रपटात शर्वरी वाघ, मोना सिंग, अभय वर्मा, सत्यराज यांसारख्या कलाकार झळकले. हा चित्रपट Disney+ Hotstar वर प्रवाहित होत आहे. या संदर्भात स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने इन्स्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि कॅप्शन दिले, "आपने मुंज्या को याद किया, और वो अपनी मुन्नी को धुंदने दौडा चला आ गया.. सारी मुन्नी, कृपया सावध रहा!! #मुंज्या आता स्ट्रीमिंग पहा!"
View this post on Instagram
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीत कमाई केली. आता पर्यत्य चित्रपटाने १३२ कोटीची कमाई केली. निर्मात्यांनी OTT वर प्रदर्शित करण्यापूर्वी हा चित्रपट २४ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्डवर प्रीमियर केला.