आर. डी. बर्मन यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे खास ट्विट
Lata Mangeshkar (Photo Credits: Facebook)

भारतीय संगीत क्षेत्रातील अजरामर नाव म्हणजे आर. डी, बर्मन. राहुल देव म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके पंचमदा यांची आज (27 जून) 81 वी जयंती. यांच्या जयंती निमित्त अनेक माध्यमातून त्यांच्यावर लिहिले जात आहे, त्यांच्या कारकीर्दीला प्रणाम केला जात आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील ट्विट करत पंचमदांबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आपल्या समुधूर संगीताने आणि प्रेमळ स्वभावाने त्यांनी अनेकांची मने जिंकली आहेत. तसंच पंजमदा आणि माझे नाते अत्यंत अनोखे होते, अशा शब्दांत लतादीदींनी आपल्या भावनांना वाट करुन दिली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी ट्विटमध्ये लिहिले, "नमस्कार. आपल्या संगीताने आणि चांगल्या स्वभावाने सर्वांची मने जिंकणारे आर. डी. बर्मन म्हणजेच आपले पंचमदा यांची आज जयंती आहे. त्यांचे त्यांच्या वडीलांवर अत्यंत प्रेम होते. त्यांचे आणि माझे नाते अत्यंत अनोखे होते. सुख-दुःखात प्रत्येक वेळी तो आपले मन माझ्याजवळ मोकळे करत असे." (आर डी बर्मन यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या 'पंचमदा' नावामागचे गुपित आणि '5' अजरामर गाणी)

Lata Mangeshkar Tweet:

पंजमदा यांनी आपल्या संगीत कलेने अनेक वर्षे रसिकांचे मनोरंजन केले. 330 पेक्षा अधिक सिनेमे त्यांनी संगीतबद्ध केले. काही गाणी त्यांनी स्वतः गायली आहेत.बॉलिवूडच्या सर्वश्रेष्ठ संगीतकारांपैकी ते  एक मानले जातात.