R D Burman Birth Anniversary: आर डी बर्मन यांच्या 81 व्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांच्या 'पंचमदा' नावामागचे गुपित आणि '5' अजरामर गाणी
R D Burman (Photo Credits: Instagram)

R D Burman 81st Birth Anniversary: संगीताच्या दुनियेत आपल्या धुनांनी अनेक सुप्रसिद्ध गायकाकडून एकाहून एक सरस गाणी देणारे प्रसिद्ध संगीतकार आर डी बर्मन यांची आज 81 वी जयंती (R D Burman Birth Anniversary). हिंदी संगीताचा दर्जा वाढविण्यात पंचमदांचा (Panchamda) मोलाचा वाटा आहे. आर जी बर्मन यांचे पूर्ण नाव राहुल देव बर्मन (Rahul Dev Burman) ज्यांना सर्व लोक पंचमदा या नावाने ओळखू लागले. त्यांच्या संगीताने अनेक 70 च्या दशकातील अनेक चित्रपट हिट झाले. अनेक अभिनेत्यांना त्यांच्या गाण्याने विशेष ओळख मिळवून दिली. अशा या हरहुन्नरी कलाकार विषयी सांगावे तितके थोडच आहे.

आर डी बर्मन यांचा जन्म 27 जून 1931 मध्ये झाला. त्यांचे वडिल सचिन देव बर्मन हे देखील प्रख्यात संगीत दिग्दर्शक होते तर त्यांची आई मीरा बर्मन यांना देखील संगीताचे बरेच ज्ञान होते. अनेकांना यांना पडलेल्या 'पंचमदा' या नावाबद्दल थोडं कुतुहूलच आहे. यांच्या नावाबद्दल सांगायचे झाले तर, People & History या युट्यूब चॅनेलने दिलेल्या माहितीनुसार, आर डी बर्मन यांचे सुरुवातीला 'टुबलू' असे टोपण नाव ठेवण्यात आले होते मात्र त्यावेळी ते खूप रडले होते त्यावेळी त्यांचा पाचवा सूर होता. त्यामुळे त्यांचे नाव पंचम असे ठेवण्यात आले. मात्र संगीत क्षेत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांना लोक पंचमदा या नावाने संबोधू लागले.

आर डी बर्मन यांची '5' सुप्रसिद्ध गाणी

दिए जलते हैं

ओ मेरे दिल के चैन

आजा आजा मैं हूं प्यार तेरा

भीगी भीगी रातों में

करवटें बदलते रहे

आर डी बर्मन यांनी असंख्य गाणी स्वरबद्ध केली आहेत. त्यामुळे त्यांची सर्वोत्कृष्ट गाजलेली गाणी सांगणे जरा अवघडच आहे. 4 जानेवारी 1994 रोजी पंचमदा यांचे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. अशा या हरहुन्नरी कलाकाराला त्यांच्या जयंतनिमित्त कोटी कोटी प्रणाम!