Lagdi Lahore Di Song in Street Dancer 3D: श्रद्धा कपूर, नोरा फतेही आणि वरुण धवन जबरदस्त डान्सचा नजराणा 'लग दी लाहोर दी' या गाण्यामधून, Watch Video
Street Dancer 3D Song (Photo Credits: YOuTube)

ABCD, ABCD 2 सारखे जबरदस्त चित्रपट देणारे दिग्दर्शक रेमो डिसूजा (Remo D'souza)  यांचा 'स्ट्रीट डान्सर 3D' (Street Dancer 3D) हा नवा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बराच चर्चेत आहे. पाशिमात्य नृत्यप्रकार अनेक नृत्यप्रकार आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून करणारे रेमो डिसूजा यांच्या या नवीन चित्रपटात असेच काही नृत्यप्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. नुकतेच या चित्रपटातील 'गरमी' गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांची या चित्रपटातील अन्य गाण्यांविषयीही उत्सुकता वाढली. या चित्रपटातील नवीन गाणे 'लग दी लाहोर दी' प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात वरुण धवन (Varun Dhawan), श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor)आणि नोरा फतेही (Nora Fatehi) जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

हे गाणे गुरु रंधावा आणि तुलसी कुमार यांनी गायिले असून गुरु रंधावा यांनीच या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार आहेत.

पाहा व्हिडिओ

हेदेखील वाचा- Garmi Song In Street Dancer 3D: नोरा फतेही आणि वरुण धवल च्या हॉट अंदाजातील 'गरमी' गाणे पाहून थंडीतही फुटेल घाम; Watch Video

या चित्रपटात वरुण धवन हे भारतीय डान्सर बनला असून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पाकिस्तानी डान्सर बनली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या दोघांतही छोटी-मोठी भांडणे, रुसवे-फुगवे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातही डान्सर प्रभू देवा दिसणार आहेत.

भूषण कुमार, दिव्या खोसला कुमारा, कृष्ण कुमार आणि लिजेल डिसूजा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात वरुण, श्रद्धा व्यतिरिक्त धर्मेश सर, राघव, सलमान यांसारखे अनेक दमदार कलाकार तसेच डान्सर्स दिसणार आहेत. येत्या 24 जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.