Garmi Song in Street Dancer 3D (Photo Credits: YouTube)

रेमो डिसूजा दिग्दर्शित स्ट्रीट डान्सर 3D चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. डान्सवर आधारित असलेला डान्स म्हणजे नृत्यप्रेमींसाठी पर्वणीच. याआधी रेमो च्या ABCD आणि ABCD 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. आता अजून त्यात काही आधुनिक नृत्याचे बदल करुन अजून हटके अंदाजात Street Dancer 3D हा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. नुकतेच या चित्रपटातील एक नवीन गाणे प्रदर्शित झाले आहे. 'गरमी' असे या गाण्याचे बोल असून अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan), हॉट अभिनेत्री नोरा फतेही (Nora Fatehi)थिरकताना दिसणार आहे. हे गाणे सुप्रसिद्ध रॅपर बादशहा (Baadshah) आणि गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) हिने गायिले आहे.

या गाण्यात नोरा फतेही चा बोल्ड आणि सेक्सी अंदाज पाहायला मिळेल. तसेच तिचा बूटी डान्सची झलक देखील पाहायला मिळेल.

या चित्रपटात वरुण धवन हे भारतीय डान्सर बनला असून श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) पाकिस्तानी डान्सर बनली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरुन या दोघांतही छोटी-मोठी भांडणे, रुसवे-फुगवे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातही डान्सर प्रभू देवा दिसणार आहेत.

भूषण कुमार, दिव्या खोसला कुमारा, कृष्ण कुमार आणि लिजेल डिसूजा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटात वरुण, श्रद्धा व्यतिरिक्त धर्मेश सर, राघव, सलमान यांसारखे अनेक दमदार कलाकार तसेच डान्सर्स दिसणार आहेत. येत्या 24 जानेवारी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.