Kobe Bryant Death: बास्केटबॉल लीजेंडच्या निधनानंतर अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा सह अनेक बॉलीवूड कलाकारांनी व्यक्त केलं दुःख
Priyanka Chopra, Akshay Kumar (Photo Credits: Facebook, IANS)

Bollywood Mourns The Demise Of Kobe Bryant: जगभरातील प्रसिद्ध अमेरिकन बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट याचा रविवारी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. 41 वर्षीय असलेला हा दिग्गज खेळाडू आपल्या 13 वर्षीय मुलीसोबत हेलिकॉप्टरमधून प्रवास करत असल्याने तिनेही या अपघातात आपले प्राण गमावले आहे. या दुर्दैवी घटनेनंतर, हॉलिवूडबरोबरच बॉलिवूडमध्येही या बातमीने शोककळा पसरली आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग, अर्जुन कपूर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या ट्विटद्वारे दुःख व्यक्त केलं आहे.

प्रियांकाने बास्केटबॉल चॅम्पियनसाठी एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. ती लिहिते की, "कोबी ब्रायंटमुळे एनबीएशी माझी पहिली खरी ओळख झाली. मी क्वीन्स न्यूयॉर्कमध्ये 13 वर्षांची होते, त्याची गोड मुलगी जियाना हिच्या वयाची. त्यानेच माझ्या मनात खेळासाठी, स्पर्धेसाठी आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीची ज्योत निर्माण केली. त्याने संपूर्ण पिढीला प्रेरणा दिली आहे. त्याचा वारसा बास्केटबॉलपेक्षा कितीतरी पटीने मोठा आहे. या अपघाताबद्दल ऐकून मी हादरले आणि खूप दु: खी झाले आहे. "

 

View this post on Instagram

 

Kobe Bryant was my first real introduction to the NBA. I was 13 living in Queens NYC, the same age as his sweet little girl, Gianna. He ignited my love for the sport, competition, and striving for excellence. He inspired an entire generation. His legacy is so much bigger than basketball. This heartbreaking accident also took the life of his young daughter, Gianna. I’m shook and so saddened. My heart goes out to Vanessa, Natalia, Bianka, and Capri Bryant. You are in my thoughts. Also sending my condolences to the loved ones of the other family and pilot in the accident. Being at tonight’s Grammys ceremony in his home at the Staples Center is going to be surreal. 💔 #RIP #KobeBryant #RIPMamba

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on

रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केलं आहे. अर्जुनने लिहिले की, “आयुष्य खरंच अस्थिर आहे, पण शेवटी सर्वच निरर्थक वाटते.” रणवीरने देखील सोशल मीडिया पोस्ट लिहीत कोबीच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे.

 

View this post on Instagram

 

Life is fickle, it all eventually feels kind of pointless. R.I.P @kobebryant #blackmamba #24

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

 

View this post on Instagram

 

🏀 👑 #rip #kobe 💔

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

जगप्रसिद्ध बास्केटबॉल खेळाडू कोबी ब्रायंट यांचा 13 वर्षांची मुलगी गियाना मारिया आणि 11 जणांसह हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू

अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडियावर लिहिले,  "निःशब्द! आपण कोबी ब्रायंट यांच्या मृत्यूमुळे एक बास्केटबॉलचा #ब्लॅकमम्बा लिजेंड गमावला आहे. माझ्या भाचीसह अनेक लहान मुलांना खेळण्यासाठी प्रेरित करणाऱ्या या खेळाडूला व त्याच्या मुलीच्या आत्म्यास शांती मिळो."