Khaali Peeli Teaser: अनन्या पांडे, ईशान खट्टर च्या 'खाली पिली' सिनेमाचा टीझर प्रदर्शित! (Watch Video)
Khaali Peeli Teaser (Photo Credits: Instagram)

बॉलिवूडमध्ये नव्या दमाचे कलाकार ईशान खट्टर (Ishaan Khatter) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) ही जोडी रुपेरी पडद्यावर झळकण्यास आता सज्ज झाली आहे. 'खाली पिली' (Khaali Peeli) या त्यांच्या सिनेमामधील लूक्सची चर्चा मागील काही दिवस सुरू होती. अशामध्ये आता खाली पिलीचा पहिला टीझर रसिकांच्या भेटीला आला आहे. धडाकेबाज अंदाजामधील त्यांचा पहिला टीझर सिनेमात मुंबईचं दर्शन घडवणार आहे. तर ईशान आणि अनन्या नॉन ग्लॅमरस आणि हटके अंदाजात रसिकांसमोर येणार आहेत.

मकबूल खान दिग्दर्शित 'खाली पिली' या सिनेमामध्ये ईशान खट्टर ' देढ शहाना' तर अनन्या पांडे 'तिखी छुरी' च्या अंदाजात दाखवण्यात आली आहे. या दोन कलाकारांसोबतच मुंबईची ओळख असणारी कालीपिली टॅक्सी देखील महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

खाली पिली टीझर

दरम्यान सिनेमाचा टीझर जाहीर करण्यात आला असला तरीही अद्याप सिनेमा प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. लॉकडाऊनमुळे मागील काही महिने ठप्प पडलेले व्यवहार आता हळूहळू सुरू झाले आहे. चित्रीकरणासोबतच अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा रीलीज करण्यालादेखील सुरूवात केली आहे.