KGF Chapter 2 (PC - Twitter)

KGF Chapter 2: यश आणि संजय दत्त स्टारर 'केजीएफ 2' चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते या चित्रपटाच्या रिलीज डेटची वाट पाहत होते. आज संध्याकाळी रिलीजची तारीख जाहीर करणार असल्याचे ट्विट संजय दत्तने केलं होतं. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी आपल्या ट्विट अकाऊंटवरून केजीएफ 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.

तरण आदर्श यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, "#केजीएफ 2 16 जुलै 2021 रोजी रिलीज होईल. या चित्रपटात संजय दत्त, यश, श्रीनिधी शेट्टी आणि रवीना टंडन दिसणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केलं आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर एक्सेल एंटरटेनमेंट अंतर्गत या चित्रपटाचे हिंदी डबिंग करणार आहेत. (वाचा - The Family Man Season 2 नंतर मनोज बाजपेयी च्या नवीन चित्रपटाची घोषणा; ओटीटी प्लेटफॉर्मवर होणार रिलीज)

केजीएफ 2 हा चित्रपट केजीएफच्या 2018 च्या चित्रपटाचा सिक्वल आहे. या सिनेमात रॉकीचा सामना अधीराशी होणार आहे. अभिनेता संजय दत्त या चित्रपटात अधीराची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. केजीएफ 2 मध्ये रवीना टंडन, प्रकाश राज, श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहेत.

केजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट प्रचंड हिट ठरला होता. प्रेक्षकांना चित्रपटातील दक्षिण अभिनेता यशची भूमिका फारचं आवडली होती. त्यानंतर तो सर्वत्र प्रसिद्ध झाला. केजीएफ चॅप्टर 1 ने या भारतीय बॉक्स ऑफिसवर 204 कोटींची कमाई केली होती. केजीएफ चॅप्टर 1 हा चित्रपट भारतातील चौथा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी डब चित्रपट ठरला होता. आचा चाहत्यांना केजीएफ 2 चित्रपटाची प्रतिक्षा आहे. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.