
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर (Kareen Kapoor) सध्या सोशल मीडियात फार अॅक्टिव्ह असते. करिना सध्या तिचे फोटो आणि व्हिडिओ सुद्धा शेअर करताना दिसून येत आहे. करिनाने नुकत्याच एक स्टेटस ठेवले होते. त्यामध्ये ती इंटीरियर डिझाइनर सोबत उभी असल्याचे दिसून आले होते. त्याचसोबत आपल्या नव्या चिमुकल्याच्या स्वागतापूर्वीची ही सर्व तयारी करण्यासाठीच घराचे डिझाइन करताना दिसून आली.(वाढदिवसा दिवशी तैमूर अली खान याने हातावर काढला टॅट्यू Watch Video)
करीना कपूर खान हिने आपल्या इंन्स्टाग्राम अकाउंटवर इंटीरियर डिझाइनर दर्शिनी हिच्यासोबत फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये करिना इंटीरियर डिझायनरला ड्रिम होम सजवण्याचे निर्देशन देताना दिसून येत आहे. करीनाने ब्लू रंगाचा गाऊन घातला आहे. ही पोस्ट शेअर करत करीनाने असे म्हटले आहे की, 2021 मधील पहिला सेट. पुन्हा आपल्या आवडीच्या डिझाइनरसोबत. ड्रिम होम. फोटो मध्ये अपार्टमेंटच्या आतमध्ये एक मोठे बुक शेल्फ दिसून येत असून मोठे झुंबर ही दिसत आहे.(गणेश चतुर्थी निमित्त करीना कपूर खान चा मुलगा तैमुर ने आपल्या खेळण्यांमधून साकारला 'हा' सुंदर गणपती बाप्पा, फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल)

करीना कपूर आणि सैफ अली खान यांनी सोशल मीडियात पुन्हा एकदा आई-वडील होणार असल्याची खुशखबरी चाहत्यांना दिली होती. तर करीना हिच्या वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाल्यास ती आमिर खान याचा 'लाल सिंह चड्ढा' मध्ये मुख्य भुमिकेत दिसून येणार आहे. या व्यतिरिक्त करण जोहर याचा 'तख्य' मध्ये ही झळकणार आहे.