सध्या बॉलिवूडमधील स्टार्सपेक्षा स्टारकिड्स प्रचंड चर्चेत आहेत. यात मिडियाचा फेवरेट आणि सर्वात जास्त हायलाईट झालेला म्हणजे करीना-सैफ अली खानचा (Kareena Kapoor and Saif Ali Khan) मुलगा तैमुर (Taimur). गोबरे गोबरे गाल, घारे डोळे असलेला तैमुर सोशल मिडियावरही प्रचंड चर्चेत आहे. आज गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) निमित्त तैमुरने खास आपल्या खेळण्यांमधून गणपती बाप्पा साकारला आहे. हा फोटो करीनाने सोशल मिडियावर शेअर केला आहे. तैमुरने स्थापना केलेल्या या अनोख्या गणरायाची मूर्ती सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
करीनाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये तैमुर या गणेशाची प्रार्थना करताना दिसत आहे.
या फोटोखाली करीनाने "या वर्षी गणेश उत्सव काही वेगळा असू शकतो. मात्र टिमने हे निश्चित केले आहे की, हा सण आपल्यासाठी महत्वपूर्ण आहे. ज्यामुळे टिमने लीगो गणपतीची प्रतिमा तयार केली आहे. तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा" असे म्हटले आहे.
हा फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्याचे अनेक चाहते या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव करत आहे. अलीकडेच करीना आणि सैफने आपण पुन्हा आई-बाबा होणार असल्याची माहिती दिली आहे.