
बॉलिवूडचे ग्लॅमरस जोडी करीना कपूर आणि सैफ अली खान पुन्हा माता-पिता बनणार ही बातमी वा-याच्या वेगासारखी सोशल मिडियावर पसरली. त्यानंतर सैफ अली खान यावर अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिल्यानंतर चाहत्यांकडून, त्याच्या कुटूंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून कौतुकाचा वर्षाव सुरु झाला. तैमुरला भाऊ मिळणार की बहिण ही गोष्ट अद्याप गुलदस्त्यात असली तरीही या बातमीने करीनाचे वडिल रणधीर कपूर आनंदून गेले असून आपला आनंद गगनात मावेनासा झाला आहे असे त्यांनी सांगितले आहे.
मिरर ला दिलेल्या मुलाखतीत, "मी ही बातमी ऐकून फार आनंदून गेलो आहे. मी स्वत: करीनाला खूप दिवसांपासून सांगत होती की तैमुरला एका भाऊ वा बहिणीची गरज आहे. या बातमीने खूप आनंदी असून येणारे बाळ निरोगी आणि सुदृढ असावे" अशी प्रार्थना रणधीर कपूर यांनी केली आहे.
रणधीर कपूर यांच्यासह रिया कपूर, सोहा अली खान, रिदिमा कपूर यांनी करीना आणि सैफ अली खानचे अभिनंदन केले आहे. Kareena Kapoor Is Pregnant Again! दुसऱ्यांदा आई होणार करीना कपूर; सैफ आली खानसह जॉइंट स्टेटमेंट द्वारे दिली नवीन पाहुण्याच्या आगमनाची 'Good Newwz'!
दरम्यान, करिना ही कदाचित पहिली मेनस्ट्रीम अभिनेत्री असेल जी आपल्या गरोदरपणातही माध्यमांसमोर येण्यास लाजली नाही. करीना जेव्हा तैमूरवेळी गरोदर होती त्यावेळी कोणताही विचार न करता तिने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती, तिने जाहिरातींसाठी शूट केले, लेक्मे फॅशन वीकमध्ये ती चालली, कॉफी विथ करण या शोमाध्येही ती दिसली होती.