Kareena Kapoor Is Pregnant Again! दुसऱ्यांदा आई होणार करीना कपूर; सैफ आली खानसह जॉइंट स्टेटमेंट द्वारे दिली नवीन पाहुण्याच्या आगमनाची 'Good Newwz'!

सैफ आली खान (Saif Ali Khan) व करीना कपूर (Kareena Kapoor) यांचे लग्न आणि त्यानंतर तैमुरचा जन्म या दोन्ही गोष्टी माध्यमांमध्ये बऱ्याच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर पुन्हा एकदा गरोदर (Pregnant) असल्याची बातमी आली होती.

Kareena Kapoor Is Pregnant Again! दुसऱ्यांदा आई होणार करीना कपूर; सैफ आली खानसह जॉइंट स्टेटमेंट द्वारे दिली नवीन पाहुण्याच्या आगमनाची 'Good Newwz'!
Kareena and Saif expecting their second child (Photo Credits: Instagram)

सैफ आली खान (Saif Ali Khan) व करीना कपूर (Kareena Kapoor) यांचे लग्न आणि त्यानंतर तैमुरचा जन्म या दोन्ही गोष्टी माध्यमांमध्ये बऱ्याच चर्चेचा विषय ठरल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून करीना कपूर पुन्हा एकदा गरोदर (Pregnant) असल्याची बातमी आली होती. आता यावर स्वतः सैफ आली खान व करीना कपूर-खान यांनी शिक्कामोर्तब केले आहे. या जोडप्याने बुधवारी एक निवेदन देऊन ही बातमी जाहीर केली. यामध्ये ते म्हणतात. ‘आमच्या कुटुंबामध्ये नव्या सदस्याचे आगमन होणार आहे हे सांगताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. आमच्या सर्व हितचिंतकांचे त्यांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद.’

बॉलीवूडमध्ये सध्या अशी फार कमी कुटुंबे आहेत जी नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. त्यातीलच सैफ आली खान, करीना कपूर-खान व तैमुर अली खान यांचे कुटुंब आहे. तैमुर तर जन्मापासूनच स्टार आहे. 20 डिसेंबर 2016 रोजी करीनाने तैमुरला जन्म दिला होता. तेव्हापासून तैमुर व त्याचे फोटो नेहमीच माध्यमांना खाद्य पुरवीत आले आहेत. आता करीना कपूर पुन्हा एकदा आई होणार आहे, त्यामुळे तैमुरसारखेच प्रेम या नव्या बाळाला मिळते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

या पूर्वीच्या रिपोर्ट्समध्ये म्हटले होते की, करिना आपले बेबी बम्प दिसण्याआधी लालसिंह चड्डाच्या उर्वरित भागासाठी शूटिंग करण्यास तयार आहे. त्यानंतर पिंकविलाने इंडस्ट्रीमधील स्त्रोताशी संपर्क साधला तेव्हा त्यांनी करीना आणि सैफ यांच्या दुसऱ्या बाळाविषयीच्या वृत्तास दुजोरा दिला. (हेही वाचा: संजय दत्त च्या फुफ्फुसाच्या कर्करोगाविषयी पत्नी मान्यता चे स्पष्टीकरण; म्हणाली ते जिंकूनच परत येतील)

दरम्यान, करिना ही कदाचित पहिली मेनस्ट्रीम अभिनेत्री असेल जी आपल्या गरोदरपणातही माध्यमांसमोर येण्यास लाजली नाही. करीना जेव्हा तैमूरवेळी गरोदर होती त्यावेळी कोणताही विचार न करता तिने अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली होती, तिने जाहिरातींसाठी शूट केले, लेक्मे फॅशन वीकमध्ये ती चालली, कॉफी विथ करण या शोमाध्येही ती दिसली होती.

(The above story first appeared on LatestLY on Aug 12, 2020 05:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).