Kannada Film Industry News: लोकप्रिय कन्नड (Kannada Actress) चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री (TV Actress Death) शोबिता शिवन्ना (Shobitha Shivanna) हिचा मृत्यू झाला आहे. ती 32 वर्षांची होती आणि तिस शोबिता एस (Shobitha S) नावानेही ओळखले जात असे. हैदराबाद गाचीबावली येथील तिच्या राहत्या घरी ती मृतावस्थेत रविवारी (1 डिसेंबर) आढळून आली. तिने आत्महत्या (Suicide) केली असावी असा पोलिसांना संशय आहे. घरातील छताला असलेल्या पंख्यास तिचा मृतदेह लटकताना आढळून आला. पाठिमागच्याच वर्षी तिचा विवाह झाला. तेव्हापासून ती या निवासस्थानी राहात होती. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, ही हत्या आहे की, आत्महत्या याबाबत तपास सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
घरातच आढळला मृतदेह
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड अभिनत्री शोभिता तिच्या शयनगृहातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळली. तिने साडीचा वापर करुन गळफास घेतल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. पोलीस पोहोचले तेव्हा तिचा मृतदेह छताला लटकत होता. पोलिसांनी तातडीने कायदेशीर कारवाई करत तिचा मृतदेह ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आला आहे. दरम्यान, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा आहे. तो अहवाल आल्यानंततर सर्व बाबींची स्पष्टता येईल, असे एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले. (हेही वाचा, Radhika Kumaraswamy’s Journey: कन्नड अभिनेत्री राधिका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी; एक अनोखी प्रेमकथा)
गाचीबावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दरम्यान, या प्रकरणी गाचीबावली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अभिनेत्रीच्या अकाली मृत्यूमागील कारणे शोधण्यासाठी तपास सुरू आहे. प्राथमिक निष्कर्ष कोणतेही गैरप्रकार सूचित करत नाहीत, परंतु अधिकारी पुढील तपशीलाची वाट पाहत आहेत, असे एका अधिकाऱ्याने म्हटले. (हेही वाचा, Chethana Raj Dies: 'फॅट फ्री' सर्जरी केल्यानंतर अभिनेत्री चेतना राजचे निधन)
शोभिता एसः कारकीर्द आणि अभिनय
बंगळुरू येथे 23 सप्टेंबर 1992 रोजी जन्मलेल्या शोभिताला कलेची सुरुवातीपासूनच आवड होती. बाल्डविन गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर तिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमधून (NIFT) फॅशन डिझायनिंगची पदवी घेतली. तिने फॅशन डिझायनींगमध्ये शिक्षण घेतले असले तरी, तिचा कल अभिनयाकडेच हारिला. ज्यामुळे ती या क्षेत्रात आली, इतकेच नव्हे तर विविध चित्रपट आणि दुरचित्रवाणी मालिकांमुळे ती घराघरांतही पोहोचली.
साडीच्या सहाय्याने गळफास
Rangareddy, Telangana: Kannada actress Shobhitha Shivanna found dead in apartment. She allegedly committed suicide by hanging herself at her residence in Kondapur, within the limits of PS Gachibowli. The police have registered a case and the deceased's body has been shifted to…
— ANI (@ANI) December 1, 2024
कोठे मागाल मदत?
दरम्यान, आत्महत्या किंवा नैराश्येने नकारात्मक विचार मनात येत असतील, अशा व्यक्तींबाबत आपणास माहिती मिळाली असेल तर आपण तातडीने खालील ठिकाणी मदत मागू शकता. ज्यामुळे तुम्हाला समुपदेशन केले जाईल. संपर्क क्रमांक आणि ईमेल खालील प्रमाणे:
वांद्रेवाला फाउंडेशन फॉर मेंटल हेल्थ 9999666555 किंवा help@vandrevalafoundation.com
TISS iCall: 022-25521111 (सोमवार-शनिवार: सकाळी 8 ते रात्री 10)
शोभिताच्या अचानक झालेल्या मृत्यूने कन्नड चित्रपट आणि दूरचित्रवाणी उद्योगाला धक्का बसला आहे. एक प्रतिभावान आणि चैतन्यदायी व्यक्तिमत्व असा उल्लेख करत तिचे चाहते, सहकारी आणि आप्तेष्टांनी सोशल मीडियावर भावना व्यक्त केल्या. दरम्यान, तिच्या मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू असताना, तिच्या निधनामुळे मनोरंजन उद्योगातील व्यक्तींना भेडसावणाऱ्या मानसिक आरोग्याच्या संघर्षांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.