Kannada Actor Susheel Gowda Passes Away: कन्नड अभिनेता सुशील गौडा याचे निधन; आत्महत्या केल्याचे वृत्त
Susheel Gowda | (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या निधनाच्या धक्क्यातून अभिनय विश्वाचे चाहते अद्याप पुरेसे सावरले नाहीत. तोवरच कन्नड अभिनेता (Kannada Actor) सुशील गौडा (Susheel Gowda) याच्या निधनाचे वृत्त आले आहे. सुशील गौडा याने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. सुशांत सिंह राजपूत याच्याप्रमाणे अभिनय सृष्टीतील आणखी एक तरुण चेहरा पडद्याआड गेल्याने चित्रपट चाहत्यांना आणखी एक धक्का बसला आहे.

अभिनेता सुशील गौडा हा त्याचे कर्नाटक राज्यातील मूळ गाव मंड्या येथे मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप पुढे येऊ शकले नाही. सुशील गौडा याने वृत्तवाहिनी मालिकांमधूनही काम केले आहे. त्याची कन्नड भाषे प्रसारित झालेली 'अंतपुरा' ही मालिका विशेष गाजली होती. या मालिकेतील भूमिकेमुळेच त्याला वलय मिळवून दिले. त्याचा 'सालगा' हा आगामी कन्नड चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. या चित्रपटात त्याने पोलिसाची भूमिका साकारली आहे.

सुशील गौडा हा एक अभिनेता होताच. परंतू, त्यासोबतच तो एक फिटनेस ट्रेनरही होता. कन्नड चित्रपटसृष्टीत पाय रोवण्यासाठी तो मेहनत घेत होता. ही मेहनत फळाला येण्याआधीच तोड जीवनाच्या पडद्यावरुन बाजूला झाला. (हेही वाचा, Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या)

 

View this post on Instagram

 

Family bonding ❤ Zelda 😍 #rottweilerpuppy #rotweiler #doglover

A post shared by Susheel Gowda (@susheel.gowda.08) on

दरम्यान, अभिनेत्री अमिता रंगानाथ हिने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सुशील गौडा याला श्रद्धांचली वाहिली आहे. अमिता रंगानाथ आणि सुशील यांनी 'अंतपुरा' या मालिकेत एकत्र काम केले होते.

अभिनेता दुनिया विजय यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून सुशील गौडा याला श्रदधांजली वहिली आहे. आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले तेव्हा तो मला हिरोसारखा वाटत होता. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच त्यांनी जगाचा निरोप घेतला.