Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या

सुशांतने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या नोकराने ही माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

Sushant Singh Rajput Suicide: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या
Sushant Singh Rajput (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. वयाच्या 34 व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला असून आत्महत्येचे नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. हिंदी मालिका 'पवित्र रिश्ता' आणि 'काय पो चे' चित्रपटातून लोकप्रिय झालेल्या सुशांत सिंह राजपूतची बातमी ऐकून सर्व चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे. मुंबई पोलिस घटनास्थळी म्हणजेच त्याच्या वांद्रयाच्या घरी दाखल झाले असून त्याच्या चाहत्यांच्या पायाखालची जमिनीच सरकली आहे.

सुशांतने आपल्या वांद्रयाच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. सुशांतच्या नोकराने ही माहिती पोलिसांना देताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

श्रद्धा कपूर सह सुशांत सिंह राजपूत 'छिछोरे' या शेवटच्या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. पवित्र रिश्ता आणि किस देश में है मेरा दिल या मालिकांमधून त्याने आपल्या अभिनयाला सुरुवात केली होती

(The above story first appeared on LatestLY on Jun 14, 2020 03:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).