
बॉलिवूड मधील कॉन्ट्रॉव्हर्सी क्विन कंगना रनौत (Kangana Ranaut) पुन्हा एकदा ट्विटरवर अॅक्टिव्ह झाली आहे. तुम्हाला सुद्धा हे वाचून धक्का बसला ना? खरंतर ट्विटरवर एक अकाउंट सध्या फारच चर्चेत असून त्यावर कंगना रनौत हिचे नाव आहे. अकाउंटला 38.8k लोकांकडून फॉलो केले जात आहे. फॉलोअर्सची संख्या पाहून असे वाटेल की खरंच कंगनाची ट्विटरवर एन्ट्री झाली आहे. पण खरं असे नाही आहे. हे अकाउंट एका चाहत्याने तयार केले आहे. परंतु ट्विटरवर केलेले ट्विट्स हे तंतोतंत कंगना सारखेच आहेत. याच कारणामुळे बहुतांश जण कंगनाचे हे अकाउंट असल्याचे मानत फॉलो करत आहेत.
कंगना रनौत हिने ट्विटरवर चाहत्यांनी काही अकाउंट्स तयार केले आहेत. काही दिवसांपूर्वी ट्विटरकडून कंगना हिचे अकाउंट बंद करण्यात आले आहे. यामागील कारण असे की, कंगना तिच्या अकाउंटवरुन आपत्तीजनक ट्विट करत होती. त्यामुळेच ट्विटरने हा मोठा निर्णय घेतला. पण आता सध्या कंगना सोशल मीडियातील इंस्टाग्रामवर फार अॅक्टिव्ह असल्याचे दिसून येते. तेथे सुद्धा ती आपली मतं. विचार चाहत्यांसोबत शेअर करते.(अभिनेता Pearl Puri ला झटका; दुसऱ्यांदा नाकारला जामीन, अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा आहे आरोप)
Tweet:
मेरा "योगी" जी से निवेदन है "उत्तरप्रदेश" में बनने वाली फ़िल्म ड्रग्स पर बनाई जाए और फ़िल्म का नाम रखा जाए “उड़ता बॉलीवुड” !!!
— Kangana Ranaut (@iKanganaTeam_) June 18, 2021
Tweet:
रामभक्तों से मेरा विनम्र निवेदन है कि वह किसी भी दुष्प्रचार में विश्वास ना करें, ताकि श्री रामजन्मभूमि पर मंदिर निर्माण का कार्य शीघ्र निर्विघ्न रूप से पूरा हो।
ॐ गं गणपतये नम: 🙏🏻
— Kangana Ranaut (@iKanganaTeam_) June 17, 2021
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर कंगना रनौत सोशल मीडियात अधिकच टीका करत होती. याआधी कंगना रनौत टीम कंगनाच्या नावाने ट्विटरवर होती. मात्र नंतर ट्विटरचे अकाउंट कंगना स्वत: ट्विट करत होती. कंगना हिे बॉलिवूड मधील ड्रग्ज रॅकेट प्रकरणी सुद्धा काही ट्विट केले होते. सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी कथित स्वरुपात न्याय मागण्यासाठी ती सुद्धा पुढे आली होती. कंगनाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास येत्या काळात तिचे काही सिनेमे प्रदर्शित होणार आहेत.