महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी Kangana Ranaut चे Nathuram Godse यांच्या समर्थनार्थ ट्विट ( View Tweet)
Nathuram Godse & Kangana Ranaut (Photo Credits: Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) गेल्या अनेक महिन्यांपासून आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. अनेक राजकीय, सामाजिक मुद्द्यावंर कंगना ट्विटद्वारे आपले मत मांडत असते. यामुळे अनेकदा वादाला तोंड फुटते. मात्र तरी देखील कंगनाने ट्विट्स करणे काही थांबवलेले नाही. आता देखील तिच्या एका नव्या ट्विटमुळे ती चर्चेत आली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या पुण्यतिथी दिवशी कंगनाने नथुराम गोडसे (Nathuram Godse) यांच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. यावरुन कंगनाला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले आहे.

कंगना रनौत हिने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, प्रत्येक गोष्टीला ती बाजू असतात. एक तुमची, दुसरी माझी आणि तिसरी सत्य. एक खरी गोष्ट सांगणार कधी काही कमिट करत नाही तर कधी काही लपवतही नाही. आणि त्यामुळे आपली पुस्तके बेकार आहेत आणि पूर्णपणे देखावा करणारी आहेत. या ट्विटमध्ये तिने #NathuramGodse हा हॅशटॅग वापरला असून काही फोटोजही ट्विट केले आहेत. कंगना रनौत हिचे हे ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Kangana Ranaut Tweet:

कंगनाने नथुराम गोडसे यांचे समर्थन केल्याबद्दल तिच्या टिकेची झोड उठली आहे. तर नेटकऱ्यांकडून तिला चांगलेच ट्रोल केले जात आहे. (जावेद अख्तर मानहानी प्रकरणी Kangana Ranaut हिला मुंबई पोलिसांकडून समन्स)

दरम्यान, कंगना रनौत तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या जीवनावर आधारीत 'थलाईवी' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याचबरोबर कंगना रनौत भारताच्या पहिल्या महिल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या बायोपिकमध्येही झळकणार आहे.