पत्रकारासोबत झालेल्या वादानंतर कंगना रनौत हिची माफी नाही, व्हिडिओतून मांडले मत
कंगना रानौत Photo Credits: Instagram)

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) हिचा आगामी चित्रपट जजमेंट है क्या (Judgemental Hai Kya ) याच्या एका पत्रकार परिषदेला गेली होती. त्यावेळी कंगना हिचे एक पत्रकारासोबत वाद झाला. त्यानंतर आता कंगना हिने बहिण रंगोली हिच्या ट्वीटरवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला असून झालेल्या वादाबद्दल आपले मत मांडले आहे.

जजमेंटल है क्या चित्रपटाला कोणत्याही प्रकारचे कव्हरेज देण्यात येणार नाही असा निर्णय इंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने घेताल होता. त्यानुसार एक पत्र पाठवत कंगनाचा हा आगामी सिनेमा बॉयकट करत असल्याचे त्यामध्ये सांगत एकता कपूर हिला कळवले होते. त्यानंतर एकता हिने यावर माफी सुद्धा मागितली. परंतु कंगनाचे आता रंगोली हिच्या ट्वीटरवरुन व्हिडिओच्या माध्यमातून मीडियासाठी अपशब्द वापरले आहेत.(कंगना रनौत आणि पत्रकारामध्ये जोरदार भांडण, 'जजमेंटल है क्या' सिनेमाच्या पत्रकार परिषदेत गोंधळ (Watch Video)

कंगना आणि पत्रकारात झालेल्या वादानंतर तिने पत्रकाराची माफी मागावी अशी मागणी करण्यात येत होती. मात्र कंगना हिने पत्रकाराला शिवीगाळ करत तो देशद्रोही आणि चिंधी व्यक्ती असल्याचे म्हटले आहे. त्याचसोबत ज्या संस्थेने तिचा सिनेमा बॉयकट करण्याचे ठरविले त्यांच्यावर सुद्धा कंगनाने टीका केली आहे.