कंगना रनौत (Kangana Ranaut) अभिनयाबरोबरच आपल्या बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे लोकप्रिय आहे. कोणत्याही मुद्द्यांवर ती अगदी मोकळेपणाने आणि न घाबरता स्पष्टपणाने बोलते. बॉलिवूडमधील अभिनेत्यांपासून राजकारणातील नेत्यांपर्यंत सर्वांना थेट टीका करते. करण जोहर (Karan Johar) आणि तिच्यातील भांडण तर अगदी जगजाहीर आहे. मात्र करण जोहरचा नुकताच ओटीटीवर रिलीज झालेल्या शेरशाह (Shershaah) सिनेमा कंगनाला भावला असून त्याचे तिने भरभरुन कौतुक केले आहे. या सिनेमात सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) प्रमुख भूमिकेत असून करण जौहरने सिनेमाची निर्मिती केली आहे. देशभक्तीपर असलेला हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून चक्क कंगनालाही आवडला आहे. त्यामुळे तिने सिद्धार्थ मल्होत्रा सग संपूर्ण टीमचे सोशल मीडिया पोस्टद्वारे कौतुक केले आहे.
करण आणि कंगना मधील वाद जूना आहे. करणवर टीका करण्याची एकही संधी कंगना सोडत नाही. मात्र यावेळी आपल्यातील भांडण विसरुन कंगनाने करणच्या सिनेमाचे कौतुक केले आहे. आपल्या पोस्टमध्ये तिने करणचे नाव लिहिले नसले तरी सिद्धार्थ मल्होत्रा सह संपूर्ण टीमचा उल्लेख केला आहे. यावरुनच कंगनाला करणचे काम आवडले असावे, हे दिसून येते.
पहा पोस्ट:
दरम्यान, करणवर टीकेची एकही संधी न सोडणारी कंगना आता चक्क करणच्या सिनेमाचे कौतुक करत असल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे कंगनाची ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान, कंगनाच्या या कृतीमुळे दोघांमधील भांडण मिटणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. मात्र कंगनाने उचललेल्या या पाऊलामुळे दोघांमधील दरी कमी होण्यास मदत होईल, असे बोलले जात आहे.