कंगना रनौत कमाईमुळे नाखुश असल्याचा खोटा दावा केल्याने बहिण रंगोली हिच्याकडून Forbes India यांना नोटिस
कंगना आणि रंगोली रनौत (Photo Credits-Twitter)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या अभिनय, फॅशन या गोष्टींसह स्वत:चे मत परखडपणे मांडण्यात नेहमीच पुढे असते. मात्र नुकताच कंगना रनौत हिच्याबाबत फोर्ब्सने जाहीर केलेल्या टॉप 100 कलाकारांच्या यादी बद्दल काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच कंगनाने तिचे त्या यादीत दिलेले कमाईचे आकडे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

कंगना रनौत हिच्या बाजूने नेहमीच उभी राहणारी तिची बहिण रंगोली हिने यावर विधान केले आहे. रंगोली हिने असे म्हटले आहे की, फोर्ब्सने यादी जाहीर केल्यानंतर सुद्धा प्रश्न उपस्थित करत त्यांना कंगना हिच्या कमाई बाबत देण्यात आलेल्या सोर्स बद्दल सुद्धा विचारले. मात्र आता रंगोली हिने ट्वीट करत असे लिहिले आहे की, कंगनाच्या टीमने तिची कमाई किती आहे याच्या सोर्स बद्दल नोटिस फोर्ब्स इंडियाला नोटिस धाडली आहे. तसेच यावर उत्तर देण्यात यावे अशी मागणी सुद्धा केली आहे.फोर्ब्सच्या टॉप 100 सेलेब्सच्या यादीत कंगना 70 व्या क्रमांकावर असुन तिची 2019 मधील कमाई 17.04 करोड रुपये असल्याचे म्हटले आहे. यानंतरच रंगोली हिने संताप व्यक्त केला आहे.(Year Ender 2019: कंगना रणौत आणि तिची बहीण ते करण जोहरच्या घरातील पार्टी, या आहेत या वर्षीच्या Bollywood Controversies)

Tweet:

यापूर्वी सुद्धा रंगोली हिने ट्वीट करत असे म्हटले होते की, फोर्ब्स इंडिया हे एक नंबरचे खोटारडे असून त्यांना मी चॅलेंज करते की, ज्या सेलेब्सच्या कमाई बाबत लिहिले आहे त्याचे पुरावे दाखवावे. कंगना हिची जी कमाई लिहिली आहे त्यापेक्षा अधिक ती टॅक्स भरत असल्याचा दावा रंगोली हिने केला आहे.तसेच कंगना हिने 2019 मध्ये किती कमाई केली हे फक्त तिच्या अकाउंट डिपार्टमेंटला माहिती आहे. आम्ही त्यांना पूर्ण माहिती देतो पण ती गुप्त ठेवली जाते.