Kangana Ranaut Birthday: कंगना रनौतला डॉक्टर बनवायचं होत वडिलांचं स्पप्न; अभिनेत्रीने अॅक्टिंगसाठी सोडलं घर, जाणून घ्या कंगनाविषयी काही खास गोष्टी
Kangana Ranaut Birthday (PC - File Image)

Kangana Ranaut Birthday: बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री कंगना रनौत आज म्हणजेच 23 मार्च रोजी आपला वाढदिवस साजरा करीत आहे. तिने आपल्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कंगनाने आतापर्यंत बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. कंगना रानौतचा जन्म 23 मार्च 1987 रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात झाला. तिने आपले संपूर्ण शिक्षण हिमाचलमधून पूर्ण केले. सायन्स विषयाची विद्यार्थीनी असल्याने कंगना रानौतच्या आई-वडिलांची इच्छा होती की, तिने डॉक्टर व्हावे. परंतु, तिला अभिनयात रस होता. यामुळेच वयाच्या पंधराव्या वर्षी कंगना रनौतने अभिनयासाठी आपले घर सोडले आणि ती मुंबईत आली. एक कलाकार म्हणून तिने थिएटरमध्ये आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. यादरम्यान, तिला बर्‍याच मोठ्या कलाकारांकडून अभिनयाचे ज्ञान प्राप्त झाले. इमरान हाश्मीच्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगना रनौतने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2006 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘गँगस्टर’ चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग बासू यांनी केले होते. (वाचा - Kangana Ranaut च्या मुंबईला PoK सोबत तुलना करण्याच्या वक्तव्यानंतर Mumbai Police च्या 'उमंग' कार्यक्रमातील तिचाच 'मुंबई तुलनात्मक सुरक्षित' चा जुना व्हिडिओ व्हायरल)

कंगना रनौतच्या डेब्यू चित्रपटाच्या ऑफरमागील एक मनोरंजक कथा देखील आहे. आयएमडीबी या वेबसाइटनुसार, अनुराग बासूने सप्टेंबर 2005 मध्ये कंगनाला एका कॅफेमध्ये कॉफी पिताना पाहिले. तो तिच्यावर खूपच प्रभावित झाला आणि शेवटी त्याने तिला त्याच्या गँगस्टर या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी साइन अप केले. पहिल्याचं चित्रपटात कंगना रानौतने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर तिने फॅशन, तनु वेड्स मनु, क्वीन, कृषी, तनु वेड्स मनु रिटर्न्स, कृषि, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका आणि पंगा अशा अनेक दमदार चित्रपटांमध्ये काम केले आहे.

कंगना रनौतने बॉलिवूडमध्ये स्वत: ला सिद्ध केले आणि राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्रीसारखे अनेक पुरस्कार जिंकले. तिने फॅशन, क्वीन, तनु वेड्स मनु रिटर्न्स, मणिकर्णिका आणि पंगा या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त कंगना सोशल मीडियावर कायम अॅक्टिव्ह असते. ती सामाजिक आणि राजकीय विषयांवर नेहमी भाष्य करत असते.

अलीकडेच कंगनाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर म्हटलं आहे की, एकदा तिच्या वडिलांनी तिच्यावर हात उंचावण्याचा प्रयत्न केला होता. ज्यानंतर तिने वडिलांचा हात धरला होता. कंगनाने लिहिलं आहे की, मी मला जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर बनावे अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला चापट मारण्याचा प्रयत्न केला. मी त्याचा हात धरला आणि त्याला म्हणाले, 'जर तुम्ही मला मारले तर मी तुम्हालाही चापट मारेल'.

कंगनाने आपल्या दुसर्‍या ट्विटमध्ये लिहिलं की, 'माझ्या वडिलांकडे परवाना रायफल आणि बंदूक होती. मला ते नेहमी ओरडत असतं. त्यांच्या भीतीमुळे मी थरथरत असे. तरुणपणी ते आपल्या कॉलेजमधील गँगवारसाठी प्रसिद्ध होते. यामुळे ते गुंड म्हणून प्रसिद्ध झाले. मी वयाच्या 15 व्या वर्षी त्याच्याशी भांडण केले आणि मी पहिली बंडखोर बागी राजपूत स्त्री बनले.'