'कलंक' चित्रपटातील भुमिकेवरुन सोनाक्षी सिन्हा 'या' कारणामुळे नाराज, मुलाखतीत व्यक्त केली भावना
सोनाक्षी सिन्हा (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

बॉलिवूड धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) ह्याच्या डान्सचे खुप चाहते आहेत. माधुर हिच्या अदा आणि नजाकत सळ्यांच्या मनावर छाप पाडतात. तसेच बॉलिवूडमध्ये नुकत्याच पदार्पण केलेल्या अभिनेत्रींसाठी आयडियल बनली आहे. तसेच 'कलंक' (Kalank) मधील आलिया भट्ट (Alia Bhatt) हिचा सुद्धा लूक सर्वांवर छाप पाडणार आहे. मात्र सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) हिला कलंक चित्रपटात दिल्या गेलेल्या अभिनयामुळे नाराज असल्याची भावना तिने एका मुलाखतीत व्यक्त केली आहे.

कलंक प्रमोशनच्या वेळी सोनाक्षी हिला शूटिंगच्या वेळचा काळ तिच्यासाठी कसा होता असा प्रश्न विचारला. त्यावेळी सोनाक्षी हिने जळत्यावर मीठ चोळू नका अशा पद्धतीची प्रतिक्रिया देत असे म्हणाली की, मला देण्यात आलेल्या भुमिकेमुळे डान्स करण्याची संधी माधुरी दीक्षित हिच्या सोबत मिळाली नाही. परंतु आलिया हिला तिच्या चित्रपटातील भुमिकेमुळे डान्स करण्याची संधी दिली गेली आहे. त्यामुळे डान्स करण्याची संधी न मिळाल्यामुळे सोनाक्षी सिन्हा नाराज आहे.(Kalank Trailer: वरुण धवन-आलिया भट्ट यांच्या अतूट प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! (Video)

या चित्रपटात मल्टीस्टार कलाकार आहेत. त्यामध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त सुद्धा मुख्य भुमिका साकारताना दिसून येणार आहे. येत्या 17 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमुळे वाढलेली प्रेक्षकांची उत्कंठता, अपेक्षा सिनेमा पूर्ण करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.