Kalank Trailer: वरुण धवन-आलिया भट्ट यांच्या अतूट प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! (Video)

बहुचर्चित मल्टीस्टारर 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून ट्रेलर सिनेमाबद्दलची उत्सुकता अधिकच वाढवतो.

Kalank Trailer: वरुण धवन-आलिया भट्ट यांच्या अतूट प्रेमाची कहाणी सांगणाऱ्या 'कलंक' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला! (Video)
Kalank Trailetr (Photo Credits: YouTube)

सध्या आलिया भट्ट (Alia Bhatt), सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha), संजय दत्त (Sanjay Dutt), माधुरी दीक्षित (Madhuri Dixit), आदित्य रॉय कपूर (Aditya Roy Kapur) आणि वरुण धवन (Varun Dhawan) स्टारर 'कलंक' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. सिनेमातील कलाकारांचे लूक, टीझर प्रदर्शनानंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता फारच वाढली आहे. यातच सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पहा सिनेमाचा टीझर

निर्माता करण जोहरने सिनेमाचा ट्रेलर ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "कोणत्याही कारणापलिकडे असलेले  प्रेम, नात्याचे विश्व!"

करण जोहर ट्विट:

पहा ट्रेलर:

 

ट्रेलरमध्ये आपल्याला आलिया भट्ट-वरुण धवन यांच्यातील अतूट नात्याचे दर्शन घडते. तर ट्रेलरचा शेवट आपल्याला 'वरुण-आलिया-आदित्य' या लव्ह ट्रँगलची चाहुल देतो. स्वातंत्र्यपूर्व काळात सांप्रदायिक दंगली भडकल्यानंतर यांचे प्रेम नेमके काय वळण घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. (पहा: वरुण धवन, आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, आदित्य राय कपूर यांचा सिनेमातील लूक!)

अभिषेक वर्मन दिग्दर्शित हा मल्टिस्टारर सिनेमा 17 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ट्रेलरमुळे वाढलेली प्रेक्षकांची उत्कंठता, अपेक्षा सिनेमा पूर्ण करतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Apr 03, 2019 04:14 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).