1 Year Of Kabir Singh: कबीर सिंह सिनेमा बनवताना 'या' अडचणींचा करावा लागला होता सामना; निर्माता मुराद खेतानी यांनी शेअर केला अनुभव
कबीर सिंह पोस्टर (Photo Credits-Instagram)

बॉलिवूडमीधल अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'कबीर सिंह' गेल्या वर्षात 21 जून रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आज 'कबीर सिंह' या चित्रपटाने 1 वर्ष पूर्ण केले आहे. याच दिवसाचे औचित्य साधत चित्रपटाचे निर्माते मुराद खेतानी यांनी असे म्हटले आहे की, मूळ चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती करताना काही आव्हानांना सामोरे जावे लागले होते. संदीप रेड्डी वांगा यांच्या द्वारे दिग्दर्शित 'कबीर सिंह' 2017 मध्ये तेलगगु ब्लॉकबास्टर 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाचा रिमेक आहे.

खेतानी यांनी असे म्हटले आहे की, मुळ चित्रपटाचा आत्मा जो आहे त्यात काही बदल न करता पुन्हा त्याचा रिमेक बनवणे एक मोठे आव्हान होते. मात्र ज्यावेळी चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल असेच झाले. प्रेक्षकांनी कबीर सिंह चित्रपटाला दिलेल्या प्रतिसादामुळे खेतानी यांनी आभार मानले आहेत.(Gulabo Sitabo Movie Review: अमिताभ बच्चन व आयुष्मान खुराना यांचा ‘गुलाबो सिताबो’ चित्रपट ‘या’ कारणांसाठी जरूर पहा; उत्तम अभिनय, दिग्दर्शनासोबत लपला आहे सामाजिक संदेश)

चित्रपट कबीर सिंह मध्ये कियारा अडवाणी आणि निकिता दत्ता यांनी सुद्धा भुमिका साकारल्या आहेत.