Kabir Singh Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर शाहिद कपूर याच्या 'कबीर सिंह' सिनेमाची धूम; 100 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री
Shahid Kapoor (Photo Credit: Instagram)

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या कबीर सिंह (Kabir Singh) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा भरुभरुन प्रतिसाद मिळत आहे. यामुळे प्रदर्शनानंतर अवघ्या 5 दिवसांत सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये धडक मारली आहे. कबीर सिंह सिनेमाच्या ट्रेलर प्रदर्शनानंतर प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली होती. सिनेमातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. इतकंच नाही तर समीक्षकांकडूनही सिनेमाचे कौतुक झाले. विशेष म्हणजे 100 कोटींच्या क्लबमध्ये सहभागी होणारा शाहिद कपूर हा पहिलाच सोलो सिनेमा ठरला आहे. (शाहिद कपूर च्या 'कबीर सिंह' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी, 3 दिवसांत केली इतकी कमाई)

ट्रेन्ड एनालिस्ट तरण आदर्श (Taran Adarsh) ने दिलेल्या माहितीनुसार, 5 दिवसात सिनेमाने 100 कोटींच्या क्लबमध्ये धडक मारली आहे. तसंच 4 दिवसांत सिनेमाने 80 कोटींचा गल्ला केला होता. त्यानंतर पाचव्या दिवशी सिनेमाने 16.53 कोटींची कमाई केली. आता या सिनेमाची एकूण कमाई 104 कोटी झाली आहे.

तरण आदर्श ट्विट:

यापूर्वी सलमान खान याच्या 'भारत' सिनेमाने 4 दिवसांत 100 कोटींची कमाई केली होती. त्यानंतर 'केसरी', 'गली बॉय' आणि 'टोटल धमाल' सिनेमाने अनुक्रमे 7, 8 आणि 9 दिवसांत 100 कोटींच्या क्लबमध्ये धडक मारली होती.

तरण आदर्श ट्विट:

कबीर सिंह हा सिनेमा तेलुगू सिनेमा 'अर्जुन रेड्डी' चा रिमेक असून संदीप वंगा यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.