jitendra | PC: X

ज्येष्ठ कलाकार Junior Mehmood सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. त्यांना चौथ्या स्तराचा यकृत आणि फुफ्फुसाचा कॅन्सर आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असताना काही दिवसांपूर्वी जॉनी लिव्हर यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी Jeetendra, Sachin Pilgaonkar यांना भेटण्याची इच्छा बोलून दाखवली. या दोन्ही कलाकारांनी त्यांचा मान राखत हॉस्पिटल मध्ये Junior Mehmood यांची भेट घेतली. सचिन पिळगावकर हे त्यांचे बालपणीचे मित्र आहेत तर जितेंद्र यांच्यासोबत त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. या भेटी दरम्यान जितेंद्र यांचे डोळे देखील पाणावल्याचं दिसलं.

ज्युनियर मेहमूद आणि सचिन पिळगावकर ही बालकलाकारांची जोडी प्रसिद्ध होती. त्यांनी 'बचपन', 'गीत गाता चल' आणि 'ब्रम्हचारी' सिनेमामध्ये काम केले होते. सचिन पिळगावकर यांनी ज्युनियर मेहमूद यांची भेट घेतली असल्याची माहिती त्यांची लेक श्रिया पिळगावकर ने दिली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार सचिन पिळगावकर जॉनी लिव्हर आणि ज्युनियर मेहमूद यांच्या संपर्कात आहे. त्यांनी मदतीची देखील चौकशी केली आहे पण त्यांनी ती नाकारल्याचं समोर आलं आहे. सचिन पिळगावकर यांनी पोस्ट शेअर करत ज्युनियर मेहमूद यांच्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली आहे. तसेच आपण व्हिडिओ कॉल द्वारा आणि एकदा प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न केला पण औषधांमुळे ते ग्लानीत असल्याचं म्हणाले आहेत. Dinesh Phadnis Passes Away: 'सीआयडी' फेम अभिनेते दिनेश फडणीस यांचे निधन .

पहा सचिन पिळगावकर यांची पोस्ट

 

View this post on Instagram

 

A post shared by Sachin Pilgaonkar Official (@sachin.pilgaonkar)

 

जितेंद्र यांच्यासोबत ज्युनियर मेहमूद यांनी 'सुहागरात', कारवा सिनेमामध्ये काम केले आहे. ते जॉनी लिव्हर यांच्यासोबत मेहमूद यांच्या भेटीला गेले होते. जितेंद्र यांनी भेटीनंतर HTशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये, ' मी त्यांच्या बाजूला बसलो होतो पण ते मला ओळखू शकले नाहीत. ते प्रचंड वेदनेमध्ये असल्याने डोळेही उघडू शकत नाहीत. त्यांना या अवस्थेमध्ये पाहणं माझ्यासाठी क्लेषदायक आहे.'