John Abraham ने आपल्या आगामी Attack चित्रपटाच्या रिलीज डेटची केली घोषणा; Independence Day निमित्ताने थिएटरमध्ये प्रदर्शित होणार
जॉन अब्राहम (Photo Credits: Instagram)

जॉन अब्राहम (John Abraham) त्याच्या आगामी अटॅक (Attack) चित्रपटात दिसणार आहे. नुकताचं जॉन आणि संपूर्ण टीम चित्रपटाच्या शूटिंगसाठी धनीपूर हवाई पट्टीवर पोहोचले होते. यावेळी त्यांनी नागरी उड्डाण मंत्री नंद गोपाल गुप्ता नंदी यांची भेट घेतली. या चित्रपटाची कहाणी बंदी बनवण्यात आलेल्या प्रवाशांवर आधारित आहे. जॉन अब्राहमसोबत या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिज आणि रकुल प्रीत सिंहही दिसणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्यराज आनंद करीत आहेत.

दरम्यान, जॉनने आपला चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. जॉनने ट्वीट करून त्याचा अटॅक चित्रपट 13 ऑगस्ट 2021 रोजी प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अ‍ॅक्शनने भरलेला हा चित्रपट पाहायला मिळेल. (वाचा -Kareena Kapoor ने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिल्यानंतर ट्विटरवर ट्रेंड झाला Aurangzeb शब्द; नेटीझन्स मीम्स शेअर करत लावत आहेत मुलाच्या नावाचा अंदाज)

यापूर्वी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जॉन अब्राहम सेटवर जखमी झाला होता. त्याच्या गळ्यातून रक्तस्त्राव झाल्याचं दिसून आलं होतं. ज्याचा व्हिडिओ अभिनेत्याने चाहत्यांसह शेअर केला होता. आता चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपला आवडता स्टार बर्‍याच दिवसानंतर पडद्यावर पाहायला मिळणार आहे.