Kareena Kapoor ने दुसऱ्यांदा मुलाला जन्म दिल्यानंतर ट्विटरवर ट्रेंड झाला Aurangzeb शब्द; नेटीझन्स मीम्स शेअर करत लावत आहेत मुलाच्या नावाचा अंदाज
सैफ अली खान, करीना कपूर आणि तैमूर अली खान (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खानने (Kareena Kapoor Khan) आज एका मुलाला जन्म दिला आहे. रविवारी सकाळी करीना कपूर खान दुसऱ्यांदा आई बनली. त्याचवेळी, सैफ अली खान चौथ्यांदा पिता झाला. करिनाने आज एका गोंडस मुलाला जन्म दिल्यानंतर चाहत्यांनी या मुलाचे नाव सांगण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या मुलाचं नाव तैमूर अली खान ठेवल्यानंतर दुसऱ्या मुलाचं नाव औरंगजेब (Aurangzeb) तर ठेवणार नाही ना? असा सवाल नेटीझन्सनी मीम्सच्या माध्यमातून केला आहे.

सध्या सोशल मीडियावर 'औरंगजेब' हा शब्द ट्रेंड होत आहे. अनेक नेटीझन्स ट्विटमध्ये करिनाच्या दुसर्‍या बाळाच्या नावाचे तर्क-विर्तक बांधत आहेत. करीना कपूर खानने एका मुलाला जन्म दिल्याची माहिती रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहणीने सोशल मीडिया पोस्टद्वारे चाहत्यांना दिली आहे. (वाचा - Kareena Kapoor Khan Blessed With A Baby Boy: लहान भावाला पाहण्यासाठी तैमूर हॉस्पिटलमध्ये दाखल; पहा Cute Photo)

दुसर्‍या बाळाच्या आगमनानंतर, करीना, सैफ आणि तैमूर त्यांच्या नवीन घरात शिफ्ट होतील. हे घर जुन्या घरापेक्षा मोठे आहे आणि त्यात बाळासाठी खास नर्सरी देखील तयार केली गेली आहे. लायब्ररीसह तैमूर आणि लहान पाहुण्यांसाठी स्वतंत्र खेळाची सोय या घरात करण्यात आली आहे. याशिवाय घरात जलतरण तलाव, बाग आणि गच्चीवर सुंदर सजावट करण्यात आली आहे.

करिना कपूर खान दुसर्‍या प्रेग्नन्सीदरम्यान कामात व्यस्त होती. तिने शूटसाठी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. जेणेकरून ती आता बेबीबरोबर दर्जेदार वेळ घालवू शकणार आहे. करीनाने बर्‍याच दिवसांपूर्वी आमिर खानच्या 'लालसिंग चड्ढा' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले होते. त्याचवेळी सैफ अली खानने 'आदिपुरुष', 'भूत पोलिस' आणि 'बंटी और बबली 2' चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर प्रसूती रजा घेतली आहे, जेणेकरून सैफ बेबीबरोबर जास्त वेळ घालवू शकणार आहे.