Lok Sabha Elections 2019: 'जान्हवी कपूर' च्या फेक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन करणारं ट्विट व्हायरल
Janhavi Kapoor Fake Account's Tweet supports Modi. (Photo Credits: Tweeter/Instagram)

लोकसभा  निवडणुक 2019 (Lok Sabha Elections 2019) च्या निम्मिताने राजकारण आणि बॉलिवूडच्या (Bollywood) संबंधांवर मत मांडणाऱ्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. रुपेरी पडद्यावरील हे सेलेब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक राजकीय पक्ष व नेत्यांना पाठिंबा देत त्यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. अशातच बोनी कपूर (Boney Kapoor) आणि श्रीदेवी (Sridevi)  यांची कन्या, जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) हिच्या नावावर असलेल्या ट्विटर अकाऊंट वरून पंतप्रधान मोदींची (Prime Minister Modi) देशाला गरज आहे अशा आशयाचे एक ट्विट जोरदार व्हायरल होतय.

"होय, ‘मला राजकारणाची समज नाही. पण देशाला मोदीजींची गरज आहे, हे मला चांगले ठाऊक आहे,’ असे ट्विट जान्हवीने केले व यावरून जान्हवी मोदींचा प्रचार करतेय, असा अर्थ नेटकऱ्यांनी काढला मात्र पडताळणी करताच हे अकाऊंट फेक असल्याचे समोर आले आहे.

मुळातच जान्हवीचे कोणतेही वेरिफाइड अकाऊंट ट्विटरवर नाही त्यामुळे तिच्या नावावर बनवलेल्या फेक अकाऊंट वरून हे ट्विट करण्यात आल्याचे उघड झाले.जान्हवीच्या नावाने बनवण्यात आलेले ट्विटर अकाऊंट २७ जूनला क्रिएट केले गेले आहे. आत्तापर्यंत यावरून केवळ १९ ट्विट करण्यात आली आहेत.अवघ्या काहीच वेळात या ट्विट ला जवळपास बारा हजार लाईक्स मिळाल्या तर ३६०० वेळा हे रिट्विट करण्यात आले होते.

निवडणुकीच्या संग्रामात मत मिळवण्याच्या स्पर्धेत हे फेक अकाऊंटच चित्र निश्चितच नवीन नाही या आधीही दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंघ यांचा जुना फोटो फोटोशॉप करून ते भाजपा व मोदींना पाठिंबा देत प्रचार करत आहेत असं दाखवण्यात आलं होत.

एरवी अनेक मुद्द्यांवर बॉलीवूडकर मत मांडत असतात मात्र राजकीय विषयात बोलताना काही मोजकेच चेहरे समोर येतात अशा वेळी अलीकडेच पदार्पण केलेल्या जान्हवीच्या नावावर व्हायरल झालेल्या या ट्विटने सगळ्यांनाच चकित करून टाकले होते.