Attack Release Date: Jacqueline Fernandez आणि Rakul Preet Singh सह John Abraham 'अटॅक'साठी सज्ज; 'या' दिवशी होणार  रिलीज
Attack Film (PC - Instagram)

Attack Release Date: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) चित्रपटांमध्ये दमदार अॅक्शन करताना दिसतो. जॉनच्या चित्रपटांसाठी चाहते उत्सुक असून आता त्याच्या आगामी अटॅक (Attack) चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. अटॅक या चित्रपटात जॉन अब्राहमसोबत जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez) आणि रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh) दिसणार आहेत. या चित्रपटाचे काही पोस्टर्स आणि प्रोमो व्हिडिओ यापूर्वी समोर आले आहेत, ज्यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.

जॉन अब्राहमचा अटॅक हा त्याच्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते आणि आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. हा चित्रपट 1 एप्रिल 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. अटॅक तीन भागांमध्ये रिलीज होणार आहे, ज्याचा पहिला भाग एप्रिलमध्ये रिलीज होणार आहे. लक्ष्य राज आनंद दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर 7 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. (वाचा - Jalsa Teaser: 'जलसा' मध्ये असणार सस्पेंसचा तडका, टीझर प्रदर्शित)

अटॅक व्यतिरिक्त जॉन अब्राहम 'एक व्हिलन रिटर्न्स', 'पठाण' आणि 'तेहरान' या चित्रपटात दिसणार आहे. पठाणमध्ये जॉनसोबत दीपिका पदुकोण दिसणार असून शाहरुख खान या चित्रपटातून पुनरागमन करत आहे. या चित्रपटाचा प्रोमो व्हिडिओ नुकताच प्रदर्शित झाला. जॉन अब्राहमचा तेहरान 26 जानेवारी 2023 रोजी रिलीज होणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by John Abraham (@thejohnabraham)

दरम्यान, जॉनने मोहित सूरीच्या 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटासाठी 21 कोटी रुपये घेतले आहेत. सूत्रानुसार, जॉन सतत त्याची फी वाढवत आहे. जॉनने बाटला हाऊससाठी सत्यमेव जयते पेक्षा जास्त शुल्क आकारले. त्याचवेळी त्याने पठाणची फी देखील वाढवली होती आणि आता एक व्हिलन रिटर्न्सची फी पठाणपेक्षा जास्त आहे. जॉनने पठाणसाठी 20 कोटी रुपये घेतले आहेत.