IPL 2021: KKR च्या पराभवानंतर Shah Rukh Khan ने ट्विटद्वारे मागितली चाहत्यांची माफी
Shah Rukh Khan (Photo Credits: YouTube)

काल (13 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या (Kolkata Knight Riders) आयपीएल (IPL) सामन्यात KKR ला हार पत्करावी लागली. या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्माने दमदार परफॉर्म केले. मुंबईच्या या विजयात गोलंदाजांची देखील महत्वपूर्ण भूमिका होती. सुरुवातीला कोलकाताने मुंबईवर चांगली पकड मिळवली होती. संघाला जिंकण्यासाठी 30 चेंडूत 31 धावांची गरज होती आणि त्यांच्याजवळ 6 विकेट्सही होत्या. परंतु, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी बाजू पलटवली आणि केकेआर ला पराभव पत्करावा लागला.

केकेआरच्या पराभवानंतर शाहरुख खान (Shah Rukh Khan) ने स्वत: ट्विट करत केकेआरच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. या ट्विटमध्ये शाहरुखने लिहिले, "निराशाजनक परफॉर्मन्स. केकेआरच्या सर्व चाहत्यांची माफी मागतो." (KKR Vs MI 5th Match: कोलकाता नाईट राईडर्सच्या हातातून सामना निसटला; मुंबई इंडियन्सचा 10 धावांनी विजय)

Shah Rukh Khan Tweet:

हाताशी आलेली मॅच गमावल्याने साहजिकच शाहरुख देखील नाराज असेल. परंतु, केकेआरच्या चाहत्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्याने दिलगिरी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विजयात राहुल चाहर, जसप्रीत बुमराह आणि क्रुणाल पांड्या यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. राहुल चाहरने 4 ओव्हरमध्ये 27 रन देत 4 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 4 ओव्हरमध्ये 28 रन दिले आणि क्रुणाल पांड्याने 4 ओव्हरमध्ये 13 रन देत 1 विकेट घेतली. या सर्वांनी 20 ओव्हरमध्ये सात विकेट घेत केकेआरला अवघ्या 142 धावांत माघारी धाडले. दरम्यान, केकेआरचा पुढील सामना रविवार, 18 एप्रिल दुपारी 3.30 वाजता रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध रंगणार आहे.