Into The Wild With Bear Grylls: अक्षय कुमार चा बेयर ग्रिल्स सोबतच्या एपिसोडचा धमाकेदार प्रोमो; Discovery+ वर 11 सप्टेंबरला होणार प्रिमियर
Akshay Kumar's Into The Wild With Bear Grylls episode promo out (Photo Credits: Twitter)

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत नंतर आता बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) सोबत Bear Grylls आपला शो 'Into The Wild With Bear Grylls'घेऊन येण्यासाठी सज्ज झाला आहे. दरम्यान 2020 च्या जानेवारी महिन्यातच अक्षय कुमार बेयर ग्रिल्स सोबत एपिसोड करणार असल्याची माहिती समोर आली होती, मात्र शो प्रिमियर कधी होणार हे मात्र गुलदस्त्यातच ठेवलं होतं. पण आज अक्षय कुमारने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवरून माहिती देताना शोचा टिझर लॉन्च केला सोबतच हा एपिसोड अक्षयच्या चाहत्यांना Discovery+ वर 11 सप्टेंबरला त्यानंतर 14 सप्टेंबरला डिस्कवरी चॅनलवर पाहता येईल.

जानेवारी महिन्यात अक्षय कुमार म्हैसूर एअरपोर्टवर दिसला होता. त्यानंतर शूटिंगसाठी तो बंदिपूरच्या जंगलात बेयर ग्रिल्स सोबत गेला. दरम्यान ज्यांना ठाऊक नाही त्यांच्यासाठी एक गोष्ट म्हणजे, बेयर ग्रिल्स हा वाईल्ड लाईफ सोबत थरारक प्रसंगांचा सामना करतो. मात्र त्याचा हा प्रवास एकट्याचा नसतो. त्याच्यासोबत जगभरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व असतात. भारतामध्ये बेयर ग्रिल्स सोबत पहिल्यांदा पीएम नरेंद्र मोदी झळकले त्यानंतर रजनीकांत आणि आता अक्षय कुमार. दरम्यान मोदींच्या आणि रजनीकांतच्या एपिसोडने चांगला टीआरपी मिळवला होता. आता तशीच अपेक्षा अक्षय कुमारकडून देखील आहे. Man vs Wild: रजनीकांत, अक्षय कुमारनंतर Bear Grylls च्या 'मॅन व्हर्सेस वाइल्ड'मध्ये झळकणार दीपिका पदुकोण आणि विराट कोहली.  

अक्षय कुमार ट्वीट

अक्षय कुमार हा बेयर ग्रिल्स सोबत शो करणारा पहिला बॉलिवूड कलाकार ठरला आहे. दरम्यान आता क्रिकेटर विराट कोहली देखील आगामी एपिसोड्समध्ये दिसू शकतो अशी चर्चा आहे.