Malaika Arora Father Death: अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) चे वडील अनिल मेहता (Anil Mehta) यांच्या शवविच्छेदन अहवालात अनेक जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. बुधवारी, 11 सप्टेंबर रोजी, अनिल मेहता (वय, 62) यांनी मुंबईतील वांद्रे येथील अल्मेडा पार्क परिसरातील ‘आयेशा मनोर’ या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी मारली, जिथे ते आपल्या पत्नीसोबत राहत होते.
ही धक्कादायक घटना घडली तेव्हा मलायका अरोराची आई फ्लॅटमध्ये होती. या घटनेनंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मेहता यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. तथापी, मुंबईच्या भाभा रुग्णालयात बुधवारी रात्री 8 वाजता शवविच्छेदन करण्यात आले, ज्यात मृत्यूचे कारण 'अनेक जखमा' असल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा - Malaika Arora's Father Anil Arora Dies by Suicide: मलायक अरोरा हिचे वडील अनिल अरोरा यांची आत्महत्या)
मलायकाने यासंदर्भात इंस्टाग्रामवर जारी केलेल्या निवेदनात वडिलांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये मलायकाने म्हटलं आहे की, 'आमचे प्रिय वडील अनिल मेहता यांचे निधन झाल्याची घोषणा करताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे. ते एक दयाळू आत्मा, एक समर्पित आजोबा, एक प्रेमळ पती आणि आमचे जिवलग मित्र होते. आमच्या कुटुंबाला या नुकसानीचा मोठा धक्का बसला आहे. या कठीण काळात आम्ही मीडिया आणि हितचिंतकांप्रती समजूतदारपणाची, समर्थनाची आणि आदराची प्रशंसा करतो.' मेहता यांच्या पार्थिवावर आज सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (हेही वाचा -Anil Mehta हे Malaika Arora चे जन्मदाते की सावत्र वडील? बाप-लेकीच्या वयामधील फरकावरून सोशल मीडीयात चर्चा; पहा कौटुंबिक माहिती)
मलायका अरोराचे सावत्र वडील अनिल मेहता यांच्या आत्महत्येच्या बातमीमुळे संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. बुधवारी सकाळी मलायकाच्या वडिलांनी बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केली. ते इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहत होते. या घटनेच्या आदल्या रात्री मलायका अरोरा आणि तिची बहीण अमृता घरी फॅमिली डिनरसाठी गेल्या होत्या. अचानक झालेल्या या अपघाताने मलायका हादरून गेली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेचे पथक फॉरेन्सिक तपास करत आहे. यासोबतच सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात आहे. घटनास्थळावरून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. त्यामुळे मेहता यांच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.