Arora Family | Instagram

अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) आणि अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघींनाही वडील अनिल कुलदीप मेहता ( Anil Kuldip Mehta) यांच्या आत्महत्या करून जीवन संपवण्याच्या निर्णयाने धक्का बसला आहे. अनिल मेहता हे 62 वर्षांचे होते. काल त्यांनी वांद्रे येथील अल्मेडा पार्क मधील आपल्या राहत्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून जीव दिला. मलायकाने रात्री वडिलांच्या निधनाचा धक्का आणि दु:ख यातून सावरण्यासाठी वेळ पाहिजे असे आवाहन हितचिंतक आणि मीडीयाला केले आहे. दरम्यान काल मलायका पुण्यात होती. या घटनेची माहिती मिळताच ती तातडीने मुंबईला आली. घरी जाताना दोन्ही लेकींना अश्रू अनावर झाल्याचं पहायला मिळाले.

मलायकाच्या वडीलांच्या निधनानंतर सोशल मीडीयामध्ये काही प्रश्नांची चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये त्यांचे आडनाव आणि बाप-लेकीच्या वयामधील अंतर यावरून चर्चा सुरू झाली आहे.

अनिल मेहता यांचं वय

मलायका अरोराने जारी केलेल्या पोस्ट मध्ये तिने वडिलांचे बर्थ इयर 1962 नमूद केले आहे. त्यामुळे ते 62 वर्षांचे होते. तर पब्लिक रेकॉर्डनुसार मलायका स्वतः पन्नाशी मध्ये आहे. बाप-लेकी मध्ये 12 वर्षांचे अंतर बघून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

अनिल मेहता कोण होते?

अनिल मेहता हे मूळचे सीमेवरील असलेल्या Fazilka या गावातील पंजाबी हिंदू होते. भारतात ब्लू म्युझिक चे ते प्रमोटर होते. Indian Merchant Navy मध्ये त्यांनी काम केले आहे. वांद्रे येथील St Andrew's Auditorium मध्ये ते म्युझिक फेस्टिवल आयोजित करत असे. या माध्यमातून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय blues musicians भारतामध्ये आणले होते. त्यांच्या देशभर कॉन्सर्ट्स झाल्या.

अनिल मेहता मलायकाचे सावत्र वडील होते?

मलायकाच्या वडीलांचे आडनाव पाहता ते सावत्र वडील होते. IANS report मध्येही तसा उल्लेख आहे. मलायकाची आई Joyce Polycarp ही मल्याळी ख्रिश्चन आहे. मलायका 11 वर्षांची असताना त्यांच्या आई वडीलांचा घटस्फोट झाला होता. मलायका आणि अमृता त्यांच्या आईसोबत चेंबूरला राहत होत्या.

अनिल मेहता यांचं निधन

अनिल मेहता यांचा मृत्यू 11 सप्टेंबर दिवशी आत्महत्या केल्याने झाला होता. Ayesha Manor इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून त्यांनी उडी मारली. ही सकाळी 9 च्या सुमारास घडलेली घटना आहे. रिपोर्ट्सनुसार मृत्यूपूर्वी ते दोन्ही लेकींशी फोन वर बोलले होते. त्यांनी 'आपण थकले' असल्याचं म्हटलं आहे.

आत्महत्या प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य हेल्पलाइन क्रमांक

टेली मानस (आरोग्य मंत्रालय) - 14416 किंवा 1800 891 4416; NIMHANS – + 91 80 26995000 /5100 /5200 /5300 /5400; पीक माइंड – ०८०-४५६ ८७७८६; वांद्रेवाला फाउंडेशन – ९९९९ ६६६ ५५५; अर्पिता आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाइन – ०८०-२३६५५५५७; iCALL - 022-25521111 आणि 9152987821; COOJ मेंटल हेल्थ फाउंडेशन (COOJ) – 0832-2252525.