IIFA Awards (संग्रहित संपादित प्रतिमा)

बॉलिवूडचा एका महत्वाचा पुरस्कार सोहळा म्हणून ‘आयफा’ (IFFA) कडे पहिले जाते. यापूर्वी भारताबाहेर या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मागच्यावर्षी हा पुरस्कार सोहळा मुंबईत पार पडला. आता 2020 चा आयफा (IIFA Awards 2020) मध्यप्रदेशच्या भोपाळ (Bhopal) आणि इंदोर (Indore) येथे होणार आहे. मध्य प्रदेशात आयफाद्वारे पुरस्कार सोहळा-2020 आयोजित करण्यासाठी, आयफाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री कमलनाथ यांनी मान्यता दिली आहे. या कार्यक्रमामुळे मध्य प्रदेशचे नाव आणि संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहचेल असा विश्वास व्यक्त केला गेला आहे. पहिला आयफा पुरस्कार सोहळा लंडनमध्ये सन 2000 मध्ये आयोजित करण्यात आला होता.

आयफा पुरस्कार सोहळा जगातील 90 देशांमध्ये प्रसारित केला जाईल, ज्यावर 700 कोटी रुपये खर्च केले जातील. या बाबतीत मध्य प्रदेश सरकार पूर्ण सहकार्य करणार आहे. या कार्यक्रमामुळे राज्यातील कलागुणांना वाव मिळे. तसेच ध्वनी, प्रकाश, चित्रपट छायाचित्रण, व्हिज्युअल इफेक्ट इत्यादी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. हा कार्यक्रम राज्यातील चित्रपट आणि पर्यटनाला प्रोत्साहन देण्याबरोबरच रोजगार निर्मितीत मैलाचा दगड ठरणार आहे.

आयफा पुरस्काराच्या 20 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यावर्षी हा पुरस्कारसोहळा भारतात पार पडला होता. यामध्ये ‘राजी’ हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर रणवीर सिंहला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. श्रीराम राघवन यांना अंधाधुनसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्राप्त झाला होता.