बनावट ई-मेल प्रकरणी Hrithik Roshan आपलं निवेदन देण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तालयात दाखल; Kangana Ranaut संदर्भातील केसची होणार चौकशी
ऋतिक रोशन (Photo Credits: Instagram)

Hrithik Roshan-Kangana Ranaut Controversy: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Rosh) आज आपले निवेदन नोंदवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाला आहे. हृतिकला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिटने कंगना रनौत (Kangana Ranaut) शी संबंधित बनावट ई-मेल (Fake E-mail Case) प्रकरणी समन्स बजावले होते. त्यानंतर हृतिक आज अधिकाऱ्यांसमोर हजर होण्यासाठी त्यांच्या कार्यालयात पोहोचले आहेत. 2016 सालापासून सुरू असलेल्या हृतिक आणि कंगनाच्या या केसमध्ये आता ट्विस्ट पाहायला मिळत आहे.

ब्लॅक टीशर्ट, फेस मास्क आणि कॅप परिधान करून हृतिक मुंबई पोलिस आयुक्त कार्यालयात पोहोचला आहे. आज पोलिस बनावट ई-मेल प्रकरणी कंगनाला पाठवण्यात आलेल्या मेलविषयी हृतिकला प्रश्न विचारतील. (वाचा - कॅन्सर विरोधात लढा देणाऱ्या Rakhi Sawant च्या आजारी आईच्या मदतीसाठी पुढे आला Sohail Khan; व्हिडिओ शेअर करत म्हणाला, काही गरज लागल्यास मला कॉल कर)

कंगनाचा आरोप आहे की, हृतिक तिला आक्षेपार्ह ई-मेल पाठवत होता. तसेच अभिनेत्याने आरोप केला होता की, हे बनावट मेसेज त्याच्या बनावट ई-मेल आयडीवरून कंगनाला पाठवण्यात आले होते. आता गुन्हे शाखेची टीम या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहे.

हृतिक आणि कंगना प्रकरणाची चौकशी मुंबईच्या सायबर क्राइम टीममार्फत करण्यात येत होती. त्यानंतर गेल्या वर्षी अभिनेत्याच्या वकिलाने हे प्रकरण क्राइम इंटेलिजेंस यूनिटकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. यानंतर हे प्रकरण आता सीआययूच्या ताब्यात आहे.