Housefull 4 Box Office Collection: 'हाउसफुल 4' ला मिळाला बेस्ट ओपनिंग सिनेमाचा मान; जाणून घ्या एकूण कमाई
Housefull 4 ( Photo Credits: Instagram)

अक्षय कुमार (Akshay Kumar), बॉबी देओल (Bobby Deol), रितेश देशमुख (Riteish Deshmukh) अशा कलाकारांची मोठी टीम असलेला 'हाउसफुल 4' (Housefull 4) हा चित्रपट हा समीक्षकांच्या टीकेचे निशाण ठरत आहे मात्र असं असलं तरी बॉक्स ऑफिस (Box Office) वर मोठी कमाई करण्यात मात्र या सिनेमाला यश लाभल्याचे समजते. इतकेच नव्हे तर प्रदर्शन नंतरच्या दुसऱ्या दिवशी 'हाउसफुल 4'ने तब्बल 18 कोटींची कमाई केली आहे त्यामुळे आतापर्यंतची आकडेवारी पाहता पहिल्या दोन दिवसांत 'हाउसफुल 4'ने 36.50 कोटींचा गल्ला जमवला आहे. आज जोडून आलेल्या दिवाळीच्या वीकेंडमुळे हा आकडा 50 कोटींच्या घरात जाणायची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तिकीटबारी वरील या दमदार परफॉर्मन्स सहितच 'हाउसफुल' कॉमेडी सीरिजमधील हा सर्वात बेस्ट ओपनिंग देणारा सिनेमा ठरला आहे.

बॉक्स ऑफिस इंडियाच्या माहितीनुसार,प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 'हाउसफुल'च्या कमाईत 5 ते 10 टक्क्यांची वाढ झाली होती. दिवाळीच्या लॉन्ग वीकेंडमुळे चित्रपटाच्या कमाईवर फायदेशीर परिणाम झालेला दिसत आहे.चित्रपट व्यवसाय समीक्षक तरण आदर्श यांच्या माहितीनुसार पुढच्या काही दिवसांत देखील हाच ट्रेंड कायम राहील असा अंदाज आहे. मात्र सोमवारी 28 ऑक्टोबर रोजी देखील सुट्टी असल्याने चित्रपटाच्या कमाईचे खरे आकडे सोमवार नंतर प्रत्यक्ष समोर येतील.

पहा ट्विट

Saaho आणि War नंतर आता Housefull 4 ही तामिलरॉकर्स वर लीक; Piracy चा चित्रपटांना पुन्हा दणका

दरम्यान, या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी यांचं आहे. अक्षय, रितेश आणि बॉबी देओलसोबत या चित्रपटात कृती सेनन, कृती खरबंदा आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.