कंगना रणौत का दिसली रेल्वे स्थानकावर तिकीट विकताना? जाणून घ्या त्या मागचं कारण
कंगना रनौत (Photo Credit : Twitter)

बॉलिवूडची 'क्वीन' म्हणजेच अभिनेत्री कंगना रणौत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असते. मग कधी तिच्या बहिणीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे किंवा कधी तिच्या फॅशन सेन्समुळे. आता मात्र ती तिच्या आगामी चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. कंगना सध्या तिच्या आगामी 'पंगा' या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये खूपच बिझी आहे. त्यात ती सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चआधी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स या रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे तिकीट देताना दिसली आहे.

अगदी सध्या वेशात ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनर्स या रेल्वे स्थानकावर दिसली. आणि आपण अभिनेत्री आहोत असं कोणतंही स्टारडम न दाखवता, ती एका सामान्य नागरिकांप्रमाणे वावरत होती.

दरम्यान, कंगनाचा आगामी चित्रपट 'पंगा'चा ट्रेलर आज (सोमवारी) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती जया निगम ही व्यक्तिरेखा साकारत आहे.

विशेष म्हणजे हा चित्रपट एका कबड्डीपटूच्या जीवनावर आधारित आहे. सिनेमात  कंगनासोबत जस्सी गिल, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी, रिचा चड्ढाही हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. सिनेमाचे पोस्टर जेव्हा सोशल मीडियावर शेअर करण्यात आले होते, त्यातही कंगना अगदी साध्या लुकमध्ये दिसत होती. आणि  सिनेमाचं दिगदर्शन केलं आहे अश्विनी अय्यर तिवारी यांनी.

सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर हिला आदित्य नारायण याने ऑनसेट घातली लग्नाची मागणी; पाहा व्हायरल व्हिडिओ

दरम्यान, 'पंगा' सिनेमानंतर कंगना 'धाकड' आणि 'थलायवी' या सिनेमांमध्ये देखील दिसणार आहे. तिचा  'थलायवी' हा सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा बायोपिक असणार आहे, तर 'धाकड' सिनेमा हा पूर्ण मनोरंजन करणारा असणार आहे.