Harami Trailer: इमरान हाशमी च्या हटके लूकमधील 'हरामी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित, इंग्रजीचा शिक्षक बनलेला मुलांना देणार गुन्हेगारीचे धडे
Harami Trailer (Photo Credits: YouTube)

गेल्या ब-याच काळापासून रुपेरी पडद्यापासून दूर असलेला अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) याचा नवा चित्रपट 'हरामी' (Harami) चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपटातील इमरान हाशमीचा लूक सर्वांनाच चकित करणारा आहे. चित्रपटाच्या नावावरून तरी या चित्रपटात काहीतरी वेगळं पाहायला मिळणार अस दिसतय. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये (Trailer) मुंबईच्या रस्त्यांवर होणारे गुन्हे पाहायला मिळत आहे. जेथे मुले लोकांचे पाकिट मारताना दिसत आहे आणि इमरान हाशमी इंग्रजीत बोलणारा गुंड दाखवला आहे. तथापि त्याचा हा हटके लूक पाहून सर्वांना अचंबित करणारा आहे.

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये इंग्रजीचा शिक्षक बनलेला इमरान सर्व मुलांना गुन्हा कसा करायचा याचे धडे देत आहे. त्याच्या हाताखाली अनेक मुलांना तो तयार करत आहे. मात्र यात ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा या ग्रुपमधील एक मुलगा प्रेमात पडतो. आणि त्याच्या प्रेमामुळे या ग्रुपची वाताहत होते ते या ट्रेलरमध्ये दाखवले आहे. सिरियल किसर इम्रान हाश्मी पहिल्यांदाच करणार बिग बींसोबत स्क्रीन शेअर

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्याम मदिराजू यांनी केले आह. या चित्रपटात इमरान सोबत रिजवान शेख, दंश्री पाटिल, राजेंद्र राणे, आशुतोष गायकवाड़, दुर्गेश गुप्ता, आदित्य भगत यांचा देखील जबरदस्त अभिनय पाहायला मिळत आहे. इमरान हाशमी इंग्रजीचा शिक्षक कसा बनतो आणि त्यानंतर अचानक तो या धंद्यात कसा हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल.