सिरियल किसर इम्रान हाश्मी पहिल्यांदाच करणार बिग बींसोबत स्क्रीन शेअर
Amitabh bachchan and Emraan Hashmi (Photo Credit): Facebook

बॉलिवूडचा महानायक बिग बी अमिताभ बच्चनसोबत(Amitabh Bachchan) काम करता यावे, अशी इच्छा फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रत्येक कलाकाराची असते. मग त्याला अभिनेता इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) तरी कसा अपवाद असेल. त्याचे बिग बीं सोबत काम करण्याचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार आहे. 'चेहरे' (Chehre) ह्या चित्रपटातून इम्रान हाश्मी आणि अमिताभ बच्चन ही जोडी प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. लवकरच ह्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होईल. ह्याबाबत आपल्याला झालेला आनंद इम्रानने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन व्यक्त केलाय.

इम्रान हाश्मीचे 'चेहरे' ह्या चित्रपटावरील ट्विट

 

आनंद पंडित यांच्या आगामी चित्रपट 'चेहरे' 21 फेब्रुवारी 2020 ला प्रदर्शित होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नुकतीच ह्या सिनेमाच्या नावाची घोषणा करण्यात आली . यावेळी ह्या सिनेमाची संपुर्ण टीम उपस्थित होती.आनंद पंडित निर्मित ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक रुमी जाफरी यांनी केले आहे.

ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शकापाठोपाठ इम्रान हाश्मीने देखील ह्या चित्रपटासंबंधीचा एक फोटो आपल्या ट्विटर अकाउंटला शेअर केला आहे. रहस्यमय कथा असलेल्या 'चेहरे ह्या सिनेमाद्वारे माझी बिग बीं सोबत काम करण्याची इच्छा पुर्ण होत असल्याने मी खूपच एक्सायटेड आहे', असं त्याने ह्यात म्हटलं आहे.

Mothers Day 2019 Special: बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आईच्या आठवणींत गायले हे सुंदर गाणे

या चित्रपटामध्ये बिग बी आणि इम्रान हाश्मीव्यतिरिक्त अन्नू कपूर, रघुवीर यादव हे कलाकारही मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.