Mothers Day 2019 Special: बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या आईच्या आठवणींत गायले हे सुंदर गाणे
Amitabh Bachchan (Photo Credits): Instagram

बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)आपल्या दमदार अभिनयासोबत आपल्या दमदार आवाजामुळेही ओळखले जातात. त्यांनी आतापर्यंत बरीच गाणीसुद्धा गायिली आहेत. मात्र अलीकडेच प्रदर्शित झालेले अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील हे गाणे त्यांच्यासाठी खूप खास आहे. 12 मे ला आलेल्या मातृदिनानिमित्त बिग बीं नी आपली आई तेजी बच्चन यांच्या(Teji Bachchan)आठवणींना उजाळा देण्यासाठी एक सुमधूर असे गाणे गायिले आहे. ह्यात अमिताभ बच्चन यांची आपल्या आईविषयी असलेली हळवी बाजू ऐकायला मिळणार आहे.

देव सगळीकडे राहू शकत नाही, म्हणून त्याने आईला बनविले असं म्हणतात, ते काही खोटं नाही. प्रत्येकासाठी आपली आई म्हणजेच आपला देव, आपले जग असते. मग तो सामान्य माणूस असो किंवा एखादा अभिनेता. आई ही बाजूच मुळी सर्वांची हळवी बाजू असते. मग ह्याला बिग बी अमिताभ बच्चन तरी कसे अपवाद ठरतील. येत्या 12 मे ला येणा-या मातृदिनाच्या निमित्ताने अमिताभ बच्चन यांनी आपल्या आईविषयीच्या भावना व्यक्त करण्याासाठी आपल्या गोड आवाजात एक गाणं गायिले आहे.

या गाण्याचे नाव आहे 'माँ'. यजत गर्ग(Yajat Garg)  ह्या  गायकासोबत त्यांनी हे गाणे गायिले आहे. ह्या गाण्यामध्ये बिग बी सुंदर ओळींमधून आपल्या आईला स्मरण करत आहेत. ह्या गाण्यात आपल्याला बिग बीं ची आपल्या आईबद्दलची हळवी बाजू, त्यांच्यातील नाते कसे होते, हे ऐकायला मिळेल. ह्या गाण्यात बिग बी आजही आपल्या आईला किती मिस करतात, हे स्पष्ट दिसून येतय.

ह्या गाण्याचे बोल पुनीत शर्मा (Punit Sharma) यांनी लिहिले असून अनुज गर्ग ह्या गाण्याचे संगीतकार आहेत. तसेच शूजित सरकार (shoojit Sarkar) ह्या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. हे गाणे 'झी म्यूझिक' (Zee Music) च्या बॅनरखाली प्रदर्शित करण्यात आले आहे. 'मेरी रोटी की गोलाई मां, मेरे सच की सब सच्चाई मां...'डर लगता है जब रोती है मां..', असे ह्या गाण्याचे बोल असून हे शब्द ऐकून तुम्हीही भावूक व्हाल.

बॉलिवूडचा महानायक तब्बल २५ वर्षानंतर झळकणार मराठी चित्रपटात, एबी आणि सीडी असे आहे ह्या चित्रपटाचे नाव

अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांविषयी बोलायचे झाले, तर अलीकडेच त्यांनी तापसी पन्नू ह्या अभिनेत्रीसोबत 'बदला'(Badla)हा चित्रपट केला. आता लवकरच ते 'कौन बनेगा करोडपती 11'(Kaun Banega Crorepati)या शो द्वारे प्रेक्षकांसमोर येणार आहेत.