बॉलिवूडचा महानायक तब्बल २५ वर्षानंतर झळकणार मराठी चित्रपटात, एबी आणि सीडी असे आहे ह्या चित्रपटाचे नाव
Amitabh Bachchan (Photo Credits: Stock Photos)

सर्वांचे लाडके, दिलखुलास असे बिग बी अमिताभ बच्चन(Amitabh bachchan) मराठी चित्रपटात कधी दिसणार, असा प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून तमाम मराठी प्रेक्षकांना पडला होता. जणू त्यांनी ह्या मागणीला उचलून धरले होते असे म्हणायला हरकत नाही. मात्र लोकाग्रहास्तव आणि प्रेक्षकांच्या प्रेमापायी अखेरीस आपल्या सर्वांचे लाडके अमिताभ बच्चन लवकरच 'एबी आणि सीडी'(AB & CD) ह्या चित्रपटातून मराठी चित्रपटात दिसणार आहे. मिलिंद लेले दिग्दर्शित ‘ए बी आणि सी डी’या मराठी चित्रपटात बिग बी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार असल्याची माहिती समोर येत आहे.

विशेष म्हणजे तब्बल 25 वर्षानंतर बिग बी मराठी पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहेत. इतकचं नव्हे तर, या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेही(Vikram Gokhale) आपल्याला पाहायला मिळणार आहे. ह्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची विक्रम गोखलेंसोबत काही महत्त्वाची दृश्येही असणार आहेत.

बिग बीं च्या बंगल्याची ‘दीवार’ पाडण्यासाठी पालिका करणार १ महिन्याची 'प्रतिक्षा'

मिलिंद लेले यांनी ह्या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली असून, कथा, पटकथा आणि संवाद हेमंत ऐदलाबादकर यांची आहे. येत्या 20 मे पासून मुंबईत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. ह तीन-चार दिवसांचे हे शूट असेल. तसेच मुंबई आणि पुण्यात ह्या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण होईल.

यापूर्वी बिग बीं नी त्यांचे मेक अप आर्टिस्ट दिपक सावंत (Deepak Sawant) यांनी निर्मिती केलेल्या 'अक्का'(Akka) या मराठी चित्रपटात जया बच्चन यांच्यासोबत 'तू जगती अधिपती' या गणपतीच्या गाण्यात काम केले होते.