Happy Daughter's Day 2020 निमित्त शिल्पा शेट्टी हिची मुलगी समिषा साठी खास पोस्ट; पहा क्युट फोटो
Shilpa Shetty with Daughter Samisha (Photo Credits: Instagram)

सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी राष्ट्रीय कन्या दिन (Daughter's Day) साजरा केला जातो. त्यामुळे आज रविवार, 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय कन्या दिवस देशभरात साजरा केला जाईल. कन्या दिनानिमित्त आपल्या लाडक्या लेकीप्रती प्रेम, मनातील भावना व्यक्त केल्या जातात. या सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड कलाकारही मागे राहिलेले नाहीत. अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने मुलगी समिषा (Samisha) हिच्या सोबतचा क्युट फोटो शेअर करत तिला Daughter's Day च्या शुभेच्छा दिल्या आहेत. या फोटोत शिल्पाने मुलीला आपल्या जवळ पकडले आहे आणि तिच्याकडे प्रेमपूर्वक नजरेने आणि हसऱ्या चेहऱ्याने पाहत आहे. (शिल्पा शेट्टी हिने Surrogacy चा पर्याय निवडण्यामागचं सांगितलं कारण; वाचा मातृत्व मिळवण्याची 'ती'ची कहाणी)

हा फोटो शेअर करत शिल्पाने आपल्या मुलीसाठी खास पोस्टही लिहिली आहे. यात तिने लिहिले की, "कोण म्हणत की चमत्कार घडत नाहीत. तुला माझ्या कुशीत घेणे, ही जादू नाही तर काय आहे? Daughter's Day निमित्त हा आनंद मी आज साजरा करत आहे. खरंतर हा आनंद साजरा करण्यासाठी मला कोणत्याही एका दिवसाची गरज नाही. आमच्या विशेषत: विवानच्या प्रार्थनांना इतके सुंदर यश दिल्याबद्दल मी देवाचे आणि निसर्गाचे जितके आभार मानने तितके कमीच आहे." तसंच ती पुढे म्हणते की, "आजच्या दिवशी तुमच्या मुलीला घट्ट मिठी मारायला विसरु नका."

पहा शिल्पा शेट्टी हिची पोस्ट:

15 फेब्रुवारी 2020 रोजी शिल्पा शेट्टी हिच्या मुलीचा जन्म झाला. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर समिषाचा जन्म झाला. त्यामुळे शिल्पा परमेश्वराचे मनापासून आभार मानत आहे. त्याचबरोबर अभिनेता अजय देवगन याने देखील मुलगी न्यासा देवगन हिचा फोटो शेअर करत तिला राष्ट्रीय कन्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.