Shilpa Shetty Kundra With Her Family (Photo Credits: Instagram)

शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  आणि तिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांच्या घरी 15 फेब्रुवारी रोजी एका चिमुकलीचे आगमन झाले. शिल्पा आणि राज यांच्या समिशाचे (Samisha Shetty Kundra)  कुंद्रा परिवारात जोरदार स्वागत झाले. समिशासाठी शिल्पाने सरोगसीचा (Surrogacy) पर्याय निवडला होता, ज्यावरून अनेकांनी कारण विचारत प्रश्न केला होता, तसेच मुलं होत नसेल तर दत्तक का घेतले नाही असेही सवाल अनेकांनी तिला केले होते, अर्थात हे अत्यंत वैयक्तिक निर्णय असले तरी शिल्पाने आता आपल्या या निर्णयामागील कारण तिच्या फॅन्ससोबत शेअर केले आहे. शिल्पाने नुकत्याच केलेल्या पिंकविला या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत हा सर्व खुलासा केला. ज्यात तिने आपण सरोगसी हा मार्ग का निवडला याविषयी स्पष्टिकरण दिले. शिल्पा शेट्टी साठी '15' नंबर ठरला लकी, आपल्या मुलीसह सोशल मिडियावर शेअर केली 'ही' आनंदाची बातमी, Watch Video

शिल्पाने सुरुवातीला बाळ दत्तक घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला मात्र त्यावेळेस ख्रिश्चन मिशनरी बंद झाल्याने ते शक्य झाले नाही. अशावेळी बॉलिवूड मध्ये सनी लियोनी, करण जोहर यासारख्या सेलिब्रिटींनी सुद्धा सरोगसी मार्फत बाळ मिळवले होते ही उदाहरणे समोर असताना तिने सुद्धा हा पर्याय निवडण्याचा निर्णय घेतला .

शिल्पाने सांगितले की "वियानानंतर मला आणखी एक मूल जन्मावेसे वाटू लागले. त्याला बहीण किंवा भाऊ मिळावा अशी मी आणि राज आम्हा दोघांचीही इच्छा होती पण मला एपीएलए नावाचा आजार होता. त्यामुळे मी दोन वेळ गरोदर राहिले असताना या आजाराचा परिणाम होऊन दोन्ही वेळेस गर्भपात झाला. शेवटी तर शरीर बाळ वाढवण्यासाठी सक्षम नसल्याचे वाटत होते, अशा वेळी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सरोगसी चा मार्ग शिल्पा आणि राज यांनी निवडला.

शिल्पा शेट्टी चा वियान आणि समिशा सोबतचा सुंदर फोटो

दरम्यान शिल्पा शेट्टीने सिनेमामधून पहिल्या बाळानंतरच ब्रेक घेतला होता, आता समिशाच्या जन्मानंतर पुन्हा एकदा मिळवलेलं मातृत्व ती एन्जॉय करत आहे. आता लॉक डाऊन काळातही ती आपल्या दोन्ही मुलांसोबत म्हणजे वियान आणि समिशा सोबत वेळ घालवत आहे.